Women ODI Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Women Cricket: गोव्याच्या महिलांनी संधी दवडली; महाराष्‍ट्राचा दोन विकेट राखून निसटता विजय

गोव्याची फिरकी गोलंदाज पूर्वा भाईडकरचा अप्रतिम मारा व्यर्थ

किशोर पेटकर

Women ODI Cricket: सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सामना जिंकण्यासाठी महाराष्ट्रासमोर १४३ धावांचे आव्हान असताना त्यांची सुरवातीस ६ बाद ३८ आणि नंतर ८ बाद ८१ अशी घसरगुंडी उडाली, पण गोव्याला संधी साधता आली नाही. परिणामी त्यांना सामना दोन विकेट राखून गमवावा लागला.

सामना बुधवारी गुवाहाटी येथे झाला. गोव्याची फिरकी गोलंदाज पूर्वा भाईडकर (४-२०) हिने अप्रतिम मारा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा डाव संकटात सापडला. पूर्वाला चांगला साथ देताना दीक्षा गावडे हिनेही टिच्चून मारा केला, पण गोव्याच्या इतर गोलंदाजांना प्रतिस्पर्ध्यांभोवती पकड घट्ट करता आली नाही.

सायली लोणकर (नाबाद ४०) व उत्कर्षा पवार (नाबाद ३७) यांनी दिलेली झुंजही कौतुकास्पद ठरली. त्यांनी नवव्या विकेटसाठी ८५ चेंडूंत नाबाद ६२ धावांची भागीदारी करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, सलामीस बढती मिळालेली तनया नाईक हिचे अर्धशतक (५९, १०६ चेंडू, ८ चौकार) आणि तळात दिव्या नाईक (२३) हिने लढविलेली खिंड यामुळे गोव्याला १४२ धावांची मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ४३.१ षटकांत सर्वबाद १४२ (पूर्वजा वेर्लेकर १, तनया नाईक ५९, सुनंदा येत्रेकर ०, निकिता मळीक ७, संजुला नाईक ११, श्रेया परब ३, पूर्वा भाईडकर ५, विनवी गुरव ८, दिव्या नाईक २३, दीक्षा गावडे २, मेताली गवंडर नाबाद ०, श्रद्धा पोखरकर ३-३३, मुक्ता मगरे २-२२, भक्ती मिरजकर २-२३) पराभूत वि. महाराष्ट्र ः ४७.१ षटकांत ८ बाद १४३ (शिवाली शिंदे १०, सायली लोणकर नाबाद ४०, रसिका शिंदे १२, श्रद्धा पोखरकर १३, उत्कर्षा पवार नाबाद ३७, मेताली गवंडर ८.१-२-२१-१, निकिता मळीक २-०-१०-०, पूर्वा भाईडकर १०-१-२०-४, दीक्षा गावडे १०-१-२८-२, सुनंदा येत्रेकर ५-०-२६-०, श्रेया परब ६-०-११-०, तनया नाईक ५-१-१४-०, संजुला नाईक १-०-९-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT