Litton Das Catch: बांगलादेश विरुद्ध भारत संघात रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची वरची आणि मधली फळी धावा करण्यात संघर्ष करताना दिसली. भारताने पहिल्या 3 विकेट्स तर पहिल्या 11 षटकांमध्येच गमावल्या. त्यातही बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने टिपलेल्या विराट कोहलीच्या झेलने सर्वांचेच लक्ष वेधले.
झाले असे की सामन्यातील 11 व्या षटकात शाकिब अल हसन गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर त्याने याच षटकातील चौथ्या चेंडूवर विराटला माघारी धाडले. पण विराटची विकेट त्याला मिळण्यात लिटन दासचे योगदान महत्त्वाचे राहिले.
शाकिबने (Shakib Al Hasan) ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर विराटचा फटका व्यवस्थित बसला नाही. त्यामुळे लिटन दासनेही हवेत झेप घेत कोणतीही चूक न करता शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत उजव्या हाताने हा झेल पकडला. त्यामुळे विराटला 9 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
लिटन दासने (Litton Das) घेतलेल्या हा झेल पाहून विराटदेखील (Virat Kohli) चकीत झाला होता. तसेच सोशल मीडियावरही लिटन दासच्या या झेलासाठी (Stunning Catch) कौतुक होत आहे.
दरम्यान, विराट आणि रोहित हे दोघेही एकाच षटकात बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. तसेच या दोघांनंतरही भारताने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. केवळ केएल राहुलने 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 186 धावा धावफलकावर लावता आल्या.
भारताचा डाव 41.2 षटकांत संपुष्टात आला. तसेच बांगलादेशकडून शाकिबने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच इबादत हुसैनने 4 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.