Lionel Messi and Sergio Aguero Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi: मित्राकडूनच 'प्लेअर ऑफ द मॅच' स्विकारताना मेस्सीच्या रिऍक्शनने वेधले लक्ष; Video

फिफा वर्ल्डकप 2022: क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला पोहचवण्यात कर्णधार लिओनेल मेस्सीचा मोठा हातभार आहे. अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाला 3-0 अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यातही मेस्सीचे योगदान मोलाचे राहिले. त्यामुळे त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.

क्रोएशियाविरुद्ध मेस्सीने 34 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलचे खाते उघडले होते. त्याने पेनल्टीवर हा गोल केला होता.

त्यानंतर त्याने त्याचा संघसहकारी 22 वर्षीय ज्युलियन अल्वारेझने 69 व्या मिनिटाला केलेल्या गोलला असिस्टही केले होते. त्यावेळी मेस्सीने दाखवलेले ड्रिब्लिंग कौशल्य अप्रतिम होते. त्याआधी अल्वारेझने 39 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला होता.

दरम्यान मेस्सीने या सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणजेच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. त्याला या पुरस्काराची ट्रॉफी मेस्सीचाच माजी संघसहकारी आणि मित्र सर्जिओ अग्युरोकडून देण्यात आली.

जेव्हा ही ट्रॉफी देण्यासाठी अग्यूरो उभा होता, तेव्हा त्याला पाहून मेस्सी खूपच खूश झाला. त्याने त्याला मिठी मारली आणि संवाद साधला. त्यानंतर त्याला त्याने ट्रॉफी दिली. तसेच अग्यूरोला अचानक आलेले पाहून अर्जेंटिनाच्या अन्य खेळाडूंनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनीही त्याला मिठी मारत आनंद व्यक्त केला. या क्षणांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

मेस्सीचा विक्रमी गोल

मेस्सीने क्रोएशियाविरुद्ध केलेला गोल हा फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील त्याचा वयक्तिक 5 वा गोल ठरला. यासह तो यावर्षीच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या यादील एमबाप्पेसह अव्वल क्रमांकावर आला आहे.

तसेच फुटबॉल वर्ल्डकपच्या कारकिर्दीतील मेस्सीचा हा 11 वा गोल आहे. त्यामुळे त्याने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये गॅब्रियल बतेस्तुआच्या 10 गोलच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

मेस्सीचा अखेरचा वर्ल्डकप

दरम्यान, यंदाचा मेस्सीचा अखेरचा वर्ल्डकप आहे. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे की अंतिम सामना हा त्याचा वर्ल्डकपमधील अखेरचा सामना असेल. मेस्सीचा हा कारकिर्दीतील 5 वा वर्ल्डकप आहे. त्यामुळे आता अखेरचा वर्ल्डकप खेळताना मेस्सीला विजेतेपदाची आशा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT