Last-minute goal led Churchill Brothers FC Goa to victory Dainik Gomantak
क्रीडा

I-League: रियल काश्मीरविरुद्ध शेवटच्या मिनिटास गोल करून चर्चिल ब्रदर्स ठरले वरचढ

किंग्जली याने 90व्या मिनिटास याने सामन्यातील गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडणारा गोल करत चर्चिल ब्रदर्सला पूर्ण तीन गुण मिळवून दिले.

दैनिक गोमन्तक

पणजी: सामन्याच्या शेवटच्या मिनिटास किंग्जली फर्नांडिस याने नोंदविलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्स संघ आय-लीग फुटबॉल सामन्यात रियल काश्मीरला वरचढ ठरला. चुरशीच्या लढतीत माजी विजेत्यांनी 1-0 फरकाने विजय नोंदविला. पश्चिम बंगालमधील नैहाटी येथे बुधवारी रात्री सामना झाला. (Last-minute goal led Churchill Brothers FC Goa to victory)

चर्चिल ब्रदर्स आता चार सामने अपराजित असून त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला. एकंदरीत गोव्यातील (Goa) संघाचा हा स्पर्धेतील चौथा विजय असून 10 सामन्यांतून त्यांनी 14 गुण प्राप्त करत त्यांनी सहावा क्रमांक मिळविला. मागील पाच लढतीत चार बरोबरी व एका विजयाची नोंद केलेल्या रियल काश्मीरची अपराजित मालिका खंडित झाली. त्यांचा हा नऊ सामन्यांतील दुसरा पराभव असून 11 गुण कायम राहिले.

किंग्जली याने 90व्या मिनिटास याने सामन्यातील गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडणारा गोल करत चर्चिल ब्रदर्सला पूर्ण तीन गुण मिळवून दिले, मात्र आनंद साजरा करताना मैदानावरच अंगावरील शर्ट काढल्यामुळे त्याला यलो कार्डही मिळाले.

चर्चिल ब्रदर्सला सामन्याच्या 34व्या मिनिटास आघाडीची सुरेख संधी होती. मात्र रियल काश्मीरचा गोलरक्षक बिलाल खान याने अफलातून कसब प्रदर्शित करत ब्राईस मिरांडा याला फटका रोखला. 40व्या मिनिटास तियागो अदान याचा ताकदवान फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे रियल काश्मीरलाही आघाडी घेता आली नाही. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना बर्नार्ड याओ याने सोपी संधी वाया घालविल्यामुळे रियल काश्मीर आघाडीविना राहिली.

मोहम्मेडन स्पोर्टिंग अग्रस्थानी

स्पर्धेतील अन्य लढतीत मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने राजस्थान (Rajasthan) युनायटेडवर 2-1 असा विजय नोंदवून अग्रस्थान कायम राखले. त्यांचे 9 लढतीतून 22 गुण झाले आहेत. पराभवामुळे राजस्थान संघाचे १३ गुण कायम राहिले. पंजाब एफसीने इंडियन ॲरोजला 3-1 असे हरविले. पंजाबचे (Punjab) आता 9 सामन्यांतून 17 गुण झाले, तर ॲरोजचे सहा गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT