Lasith Malinga X/MIPaltan
क्रीडा

IPL 2024: मुंबई इंडियन्सचं त्रिकुट पुन्हा एकत्र! मलिंगाकडे सोपवली संघाची मोठी जबाबदारी

Lasith Malinga in Mumbai Indians: आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Pranali Kodre

Lasith Malinga appointed as a Bowling Coach of Mumbai Indians in IPL:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला अद्याप काही महिने बाकी आहेत. पण असे असले तरी संघांनी आपली संघ बांधणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

माजी गोलंदाज मलिंगाला मुंबई इंडियन्सने गोलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. तो शेन बॉन्ड यांची जागा घेईल. बॉन्ड 2015 पासून गेली नऊ वर्षे मुंबई इंडियन्स संघात ही जबाबदारी सांभाळत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचा हा करार संपला. आता मलिंगा यापुढे गोलंदाजी प्रशिश्रक म्हणून भूमिका निभावेल.

मलिंगाला मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफामध्ये मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांची साथ मिळेल. दरम्यान, यामुळे पोलार्ड, मलिंगा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांचे त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आलेले चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

तथापि, मलिंगाने यापूर्वी मुंबई इंडियन्सचा मेजर लीग क्रिकेटमधील संघ एमआय न्यूयॉर्क आणि साऊथ आफ्रिका टी20 लीगमधील एमआय केपटाऊन या संघांचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.

मलिंगा या जबाबदारीबद्दल म्हणाला, 'मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक झाल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. एमआय न्यूयॉर्क आणि एमआय केपटाऊननंतर माझा मुंबई इंडियन्स कुटुंबातील प्रवास सुरूच आहे. मी मार्क, पॉली आणि रोहित, तसेच संघाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे, विशेषत: गोलंदाजी फळीबरोबर.'

दरम्यान, मलिंगा जरी आत्ता प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्स संघात आला असला, तरी त्याचे या संघाबरोबरचे नाते फार जुने आहे. तो 11 वर्षे या संघाकडून खेळाडू म्हणून खेळला आहे. तसेच 2018 मध्ये त्याने संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले आह. त्याने मुंबई इंडियन्सकडून 4 वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT