Kusal Mendis Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: हैदराबादमध्ये कुसल मेंडिसचं वादळ, 65 चेंडूत शतक झळकावून मोडला कुमार संगकाराचा रेकॉर्ड!

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चा आठवा सामना पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चा आठवा सामना पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला.

श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसने शानदार शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मेंडिसने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या 77 चेंडूत 122 धावा केल्या. यादरम्यान त्याने अवघ्या 65 चेंडूत शतक झळकावले.

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने लवकरच पहिली विकेट गमावली, त्यानंतर लंकन संघ पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गडगडेल असं वाटलं होतं.

पण कुसल मेंडिस फलंदाजीला आला, त्याने तूफान फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला. अवघ्या 65 चेंडूत शतक झळकावणारा मेंडिस विश्वचषकात लंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला.

त्याने 122 धावांच्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकारही मारले. त्याची खेळी पाहून लंकेचे चाहते आनंदाने नाचू लागले. मेंडिस आज मोठी खेळी खेळणार असे वाटत होते, मात्र तो हसन अलीचा बळी ठरला.

कुमार संगकाराचा विक्रम मोडला

कुमार संगकाराने वेलिंग्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध (England) 70 चेंडूत शतक झळकावले होते. त्याने 86 चेंडूत 117 धावांची नाबाद खेळी खेळली होती. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले होते.

विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत कुसल मेंडिसने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन (66 चेंडू) आणि कॅनडाचा जॉन डेव्हिसन (67 चेंडू) यांचाही विक्रम मोडला.

विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या

या खेळीदरम्यान कुसल मेंडिस पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोशन महानामाच्या नावावर होता. 1987 मध्ये पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये 89 धावा काढल्या होत्या.

ब्रेंडन कुरुप्पूने 1983 मध्ये स्वानसी येथे 72 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा संघ विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करु शकलेला नाही. दोन्ही संघांमध्ये 8 सामने झाले आहेत. पाकिस्तानने 7 सामने जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT