Krunal Pandya & Pankhuri Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Krunal Pandya अन् पंखुरी शर्माच्या घरी आला छोटा पाहुणा, जाणून घ्या काय ठेवले नाव

Krunal Pandya: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आणि पंखुरी शर्मा यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे.

दैनिक गोमन्तक

Krunal Pandya & Pankhuri Sharma: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. क्रुणाल बाप झाला आहे. याचा खुलासा खुद्द क्रुणाल पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. विशेष म्हणजे, त्याने मुलाचे नावही सांगितले आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करुनही टीम इंडियातून बाहेर पडणाऱ्या क्रुणाल पंड्याने ट्विटरच्या माध्यमातून बाप झाल्याची गूडन्यूज दिली आहे.

दरम्यान, क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) पत्नी पंखुरी शर्मासोबत (Pankhuri Sharma) त्याच्या मुलाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत क्रुणाल आणि पंखुरी आपल्या मुलाचे चुंबन घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत कृणाल आणि पंखुरी त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी मुलाचे नाव ‘कवीर क्रुणाल पंड्या’ असे लिहिले आहे. क्रुणालने ग्लोबचा एक इमोजीही शेअर ठेवला आहे, ज्याला तो त्याचे जग मानतो असे म्हणता येईल.

दुसरीकडे, क्रुणाल पांड्या आणि मॉडेल पंखुरी शर्मा यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले होते. जवळपास पाच वर्षांनंतर ते पालक बनले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पंखुरीला क्रिकेट (Cricket) पाहणे आवडत नाही. परंतु ती क्रुणाल पांड्याचे सर्व सामने पाहते. क्रुणाल पांड्याने 2018 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) पदार्पण केले. त्यानंतर त्याने 19 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT