KL Rahul and Athiya Shetty Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul Marriage: केएल राहुल लग्नासाठी घेणार सुट्टी? 'या' मालिकेला मुकण्याची शक्यता

केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Pranali Kodre
KL Rahul and Athiya Shetty

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे. हे दोघेही जवळपास गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघेही जानेवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

KL Rahul

केएल राहुल (KL Rahul) लग्नासाठी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिका खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार त्यावेळी त्याने सुट्टी मागितली आहे. सध्या केएल राहुलला न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. पण तो डिसेंबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातून पुनरागमन करणार आहे.

पण नंतर श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेदरम्यान सुटी घेणार असल्याची शक्यता आहे. तरी अद्याप बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेबद्दल घोषणा केलेली नाही.

KL Rahul

दरम्यान, पुढीलवर्षी वनडे वर्ल्डकप भारतात खेळला जाणार आहे. त्याचदृष्टीने केएल राहुलही पुढील काही मालिकांमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. केएल राहुल वनडेत भारताचे उपकर्णधारपदही सांभाळतो. त्याचबरोबर त्याने रोहितच्या अनुपस्थितीत अनेकदा भारताचे नेतृत्वही केले आहे.

KL Rahul

पण, केएल राहुलचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. तो सातत्यपूर्ण कागिरी करण्यात अपयशी ठरत आहे. पण एकूणच पाहायचे झाल्यास त्याची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी चांगली आहे.

KL Rahul

केएल राहुलने वनडे क्रिकेटमध्ये 45 सामन्यांत 45 च्या सरासरीने 1665 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

KL Rahul and Athiya Shetty

दरम्यान, अथिया शेट्टी ही भारतीय अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. आयपीएल 2022 दरम्यान सुनील शेट्टी केएल राहुल कर्णधार असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्येही आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT