KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: KL राहुलने मैदानात उतरताच रचला इतिहास

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa Cricket Team) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे (Indian Cricket Team) नेतृत्व करताना केएल राहुलने (KL Rahul) इतिहास घडवला आहे. राहुल 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये कर्णधार न होता 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी आणि आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे राहुलकडे (KL Rahul) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर निवड समितीने यापूर्वी रोहितला टी-20 नंतर वनडे संघाचा कर्णधार बनवले होते. धडाकेबाज फलंदाज राहुल त्याच्या 39 व्या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करत आहे. देशासाठी 50 एकदिवसीय सामने खेळण्यापूर्वी संघाचे नेतृत्व करणारा शेवटचा खेळाडू मोहिंदर अमरनाथ होता. ज्याने ऑक्टोबर 1984 मध्ये पहिल्यांदा संघाचे नेतृत्व केले. मोहिंदरने जेव्हा पहिल्यांदा संघाचे नेतृत्व केले तेव्हा तो 35 वा वनडे खेळत होता.

केएल राहुल नाणेफेक हरला

केएल राहुलची वनडे कर्णधार म्हणून पहिल्यांदाच पराजित झाला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने वनडे पदार्पण केले. या सामन्यात केएल राहुल ओपनिंग करताना दिसणार आहे. गेली दोन वर्षे तो मधल्या फळीत खेळत होता. परंतु रोहित शर्मा अजून उपस्थित नसल्याने त्याने ओपनिंगला जाण्याचा निर्णय घेतला.

कसोटी मालिकेतही कर्णधार बनला होता

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत केएल राहुललाही कर्णधारपदाची संधी मिळाली. दुसऱ्या कसोटीपूर्वी विराट कोहलीला दुखापत झाली होती. अशा स्थितीत राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. या सामन्यापूर्वी त्याने केवळ एकदा प्रथम श्रेणी सामन्यात कर्णधारपद भूषवले होते. त्याला टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी त्याने हे काम केले. 2020 आणि 2021 मध्ये तो संघाचा कर्णधार होता. मात्र, त्यात फारसे यश आले नव्हते. त्याच्या नेतृत्वाखाली संघ एकदाही प्लेऑफमध्ये जाऊ शकला नाही. KL राहुल आता IPL 2022 मध्ये लखनौ फ्रँचायझीचा कर्णधार असल्याची नोंद आहे. आयपीएलच्या या नव्या संघाने राहुलला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT