KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: केएल राहुल 4 हजारी मनसबदार! गेल-वॉर्नरला मागे टाकत या रेकॉर्डमध्ये गाठला 'पहिला नंबर'

केएल राहुलने 4 हजार आयपीएल धावा पूर्ण करताच एक मोठा विक्रम नावावर केला आहे.

Pranali Kodre

KL Rahul 4000 IPL Runs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (15 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 2 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी कर्णधार केएल राहुलने मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून सलामीला उतरलेल्या केएल राहुलने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारले.

या खेळीदरम्यान केएल राहुलने आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या नावावर आता आयपीएलमध्ये 114 सामन्यातील 105 डावात 47.02 च्या सरासरीने 4044 धावा झाल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा 14 वा खेळाडू आहे.

तसेच केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या यादीत अव्वल क्रमांक मिळवताना ख्रिस गेलचा विक्रम मागे टाकला आहे. गेल याने 112 आयपीएल डावात 4000 धावा पूर्ण केल्या होत्या. केएल राहुलने 105 डावातच हा विक्रम केला आहे.

या विक्रमाच्या यादीत केएल राहुल आणि ख्रिस गेल यांच्यानंतर डेव्हिड वॉर्नर असून त्याने 114 डावात 4000 धावा पूर्ण केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारे खेळाडू -

  • 105 डाव - केएल राहुल

  • 112 डाव - ख्रिस गेल

  • 114 डाव - डेव्हिड वॉर्नर

  • 128 डाव - विराट कोहली

  • 131 डाव - एबी डिव्हिलियर्स

लखनऊचा पराभव

दरम्यान केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या होत्या. पंबाजकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19.3 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केला.

पंजाबकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अखेरीस शाहरुख खानने 10 चेंडूत नाबाद 23 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. लखनऊकडून युधवीर चहर, रवी बिश्नोई आणि मार्क वूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT