KL Rahul - Athiya Shetty Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul - Athiya Shetty: हातात हात अन् चेहऱ्यावर आनंद! लग्नानंतरच्या पहिल्या Video ने वेधले लक्ष

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नानंतरचा पहिला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

KL Rahul - Athiya Shetty: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी 23 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याबरोबरच या नवदाम्पत्याचा लग्नानंतरचा पहिला व्हिडिओनेही चाहत्यांचे लक्ष वेधले.

केएल राहुल आणि अथिया यांचा लग्नसोहळा अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फ्रार्महाऊसवर पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी हे आलिशान फार्महाऊस सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. अथिया ही सुनील शेट्टीची मुलगी आहे.

केएल राहुल आणि अथिया यांनी लग्नानंतर सोशल मीडियावर फोटोही शेअर केले. त्यांच्या या फोटोवरही अनेक प्रतिक्रिया आल्या. तसेच हे दोघेही लग्नानंतर मीडियासमोर आले होते. यावेळीच्या फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

(KL Rahul - Athiya Shetty First Video After Marriage)

या व्हिडिओमध्ये दिसते की अथियाने सुंदर गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच केएल राहुलने शेरवानी घातली आहे. यावेळी अथिया आणि केएल राहुलने हातात हात घेतला असून दोघेही खूश दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांकडून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.

तसेच या दोघांचे लग्नातील फोटो आणि व्हिडिओ समोर येण्यापूर्वी सुनील शेट्टीने मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याने या दोघांच्याही लग्नाची पुष्टी करताना तो सासरा बनला असल्याचे सांगितले होते. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

दरम्यान, अथिया ही देखील अभिनेत्री असून तिने बॉलिवूडमध्ये 2015 साली 'हिरो' चित्रपटातून पदार्पण केले होते. तसेच केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. केएल राहुल त्यांच्या लग्नासाठी काही काळ भारतीय संघातून विश्रांतीही घेतली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाचा भाग नाही.

दरम्यान, केएल राहुल आणि अथिया यांच्या लग्नाचे रिसेप्शन इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामानंतर होण्याची शक्यता आहे.

हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यापूर्वी त्यांनी एकमेकांबरोबरचे शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT