Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup मधून बाहेर झाला, तरी जखमी विलियम्सन न्यूझीलंडसाठी निभावणार मोठी भूमिका?

आयपीएल 2023 च्या सुरुवातीला केन विलियम्सनला झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली असून तो यामुळे आगामी वनडे वर्ल्डकप खेळण्याची शक्यता कमी आहे.

Pranali Kodre

Kane Williamson: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या सुरुवातीलाच गुजरात टायटन्स आणि न्यूझीलंड संघांना जोरदार धक्का बसला, कारण दिग्गज फलंदाज केन विलियम्सन गंभीररित्या जखमी झाला. आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना विलियम्सनला गुडघ्याची दुखापत झाली. त्यामुळे तो या हंगामातून बाहेर झाला.

तसेच त्याच्यावर मायदेशी परतल्यानंतर शस्त्रक्रियाही करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आता विलियम्सनला आगामी वनडे वर्ल्डकपपर्यंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे कठीण आहे. आशात त्याचे वनडे वर्ल्डकपमधून बाहेर होणे जवळपास पक्के आहे. पण असे असले तरी तो या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावू शकतो. याबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी संकेत दिले आहेत.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विलियम्सन न्यूझीलंडच्या वनडे संघाचा कर्णधारही आहे. पण आता त्याच्या या वर्ल्डकपमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

याबद्दल बोलताना स्टीड म्हणाले, 'सध्या काहीही सांगणे घाईचे ठरेल. आम्हाला आत्तापर्यंत इतकेच कळाले आहे की त्याची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. त्याने या दुखापतीतून सावरण्यास सुरुवात केली आहे. पण तो खेळण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. पण आम्ही त्याच्यासारखी क्षमता असलेल्या खेळाडूला बाहेर ठेवू इच्छित नाही. त्याने मार्गदर्शक म्हणून भारतात आमच्याबरोबर यावे.'

जर विलियम्सन वर्ल्डकपमध्ये खेळला नाही, तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करताना दिसू शकतो. तसेच मार्क चॅपमन विलियम्सनच्या जागेवर खेळू शकतो. त्याने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध टी20 मालिकेत चांगली कामिगिरी केली आहे.

चॅपमनने पाकिस्तानविरुद्ध 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत 166 च्या स्ट्राईक रेटने 290 धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीनंतर त्याला वनडे संघातही जागा मिळाली आहे.

याबद्दल स्टीड म्हणाले, 'मार्क चॅपमनला वनडे संघात त्याच्या केवळ एका खेळीमुळे जागा मिळालेली नाही. संघातील जागेसाठी चांगली स्पर्धा आहे. वर्ल्डकपच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे आणि मार्क चॅपमनबद्दल आम्ही विचार करत आहोत.'

दरम्यान, सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडला 27 एप्रिलपासून 7 मेपर्यंत 5 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT