नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला बाबू गावकर (उजवीकडे) व रौप्यपदक विजेता शिवनाथ माजीक. Dainik Gomantak
क्रीडा

Kathmandu Pentathlon: गोव्याच्या बाबू गावकरला आंतरराष्ट्रीय सुवर्ण; नेपाळमधील स्पर्धेत अव्वल

शिवनाथ माजीकला लेझर रनमध्ये रौप्य

किशोर पेटकर

UIPM 2023 Pentathlon Nepal: गोव्याचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेता बाबू गावकर याने भारतासाठी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम रविवारी साधला.

नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या यूआयपीएम ग्लोबल लेझर रन सिटी टूर स्पर्धेत तो अग्रेसर ठरला. 8 मिनिटे 35 सेकंद वेळेसह त्याने सीनियर गटात अव्वल क्रमांक मिळविला.

याच स्पर्धेत 21 वर्षांवरील ज्युनियर गटात गोव्याच्या शिवनाथ माजीक याने रौप्यपदक पटकावले. त्याने 9 मिनिटे 54 सेकंद वेळ नोंदविली. राहुल दर्शन याने 8 मिनिटे 45 सेकंद वेळेस सुवर्णपदक, तर नेपाळच्या अमृत डांग याने 13 मिनिटे 29 सेकंद वेळेसह ब्राँझपदक प्राप्त केले.

बाबू याने सीनियर गटात नोंदविलेली वेळ स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी ठरली. अफगाणिस्तानच्या रमिन अहमदी याला 8 मिनिटे 44 सेकंद वेळेसह रौप्य, तर नेपाळच्या राम बहादूर याला 8 मिनिटे 47 सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळाले.

आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला बाबू आणि रौप्यपदक विजेता शिवनाथ यांचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्ष संध्या पालयेकर, गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेचे अध्यक्ष संजीव गडकर, क्रीडा खात्याचे उपसंचालक विवेक पवार यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT