Kapil Dev and MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL: ' ...नाहीतर अंडी विका', विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा प्रेशर घेणाऱ्या क्रिकेटर्सला टोला

दबावाची तक्रार करणाऱ्या क्रिकेटपटूंवर माजी भारतीय कर्णधाराने टीका केली आहे.

Pranali Kodre

Kapil Dev: भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी दबावाची तक्रार करणाऱ्या खेळाडूंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यापूर्वीही त्यांनी जेव्हा या विषयावर मतं मांडली होती, त्यावेळी त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. पण कपिल देव आपल्या मतांवर ठाम असल्याचेच दिसत आहे.

त्यांनी नुकताच कोलकात्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दबावाची तक्रार करणाऱ्या खेळाडूंना त्यांचा दृष्टीकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की जर दबाव झेलता येत नसेल, तर खेळणे सोडून द्यायला हवे.

(Kapil Dev statement on cricketers complaining about pressure)

त्यांनी म्हटले आहे की 'मी नेहमी ऐकत असतो की आम्ही आयपीएल खेळतो. तिथे खूप दबाव असतो. हे शब्द नेहमीचेच आहेत, बरोबर. त्या सर्वांना मी म्हणतो की खेळू नका. दबाव असतो. पण जर तुम्ही या स्तरावर क्रिकेट खेळत आहात, तर तुमचे कौतुकही होईल आणि टीकाही. जर तुम्ही टिकेला घाबरत असाल, तर खेळू नका.'

'तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि तुम्हाला दबाव असतो? हे कसं शक्य आहे. १०० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशातून तुम्ही २० जणं खेळत असता आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला दबाव आहे? त्यापेक्षा, ही अभिमानाची गोष्ट आहे असे म्हणा. तुम्हाला लोकांकडून खूप प्रेम मिळत असते. तो अभिमान घेण्यास शिका.'

कपिल देव यांनी पुढे म्हटले की 'दबाव (Pressure) हा अमेरिकन शब्द आहे. जर तुम्हाला काम करायचे नसेल, तर करू नका. तुम्हाला कोणी जबरदस्ती करतंय का? जाऊन केळ्याचे दुकान टाका, अंडी विका.'

'पण जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा ती दबाव म्हणून का घेता. ती एक आनंद म्हणून स्विकारा आणि त्याची मजा घ्या. ज्यादिवशी तुम्ही हे करायला सुरुवात कराल, तेव्हापासून तुम्हाला तुमचे काम सोपे वाटायला लागेल. जर तुम्ही त्याच गोष्टीला दबाव संजत असात, तर त्यातून चांगले काही घडणार नाही.'

दरम्यान, मागी काही वर्षांत अनेक खेळाडूंनी मानसिक आरोग्याचे आणि दबावाचे कारण देऊन विश्रांती घेतली आहे. तसेच या विषयावर कपिल देव यांनी यापूर्वीही भाष्य केले होते. त्यावेळीही त्यांनी दबाव वाटत असेल, तर खेळू नका, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT