Kane Williamson 29th Test Hundred Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs BAN: विलियम्सनचे शानदार 'शतक'; कोहली अन् सर डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडण्यापासून एक पाऊल दूर!

Manish Jadhav

Kane Williamson 29th Test Hundred: न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने वनडे विश्वचषकानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंड संघाने बांगलादेशविरुद्ध 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात केली आहे. सिल्हट येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम खेळताना 310 धावांवरच आटोपला.

प्रत्युत्तरात किवी संघाने 98 धावांत तीन विकेट गमावल्या. यानंतर विल्यमसनने एका बाजूकडून संघाची धुरा सांभाळली. त्याने डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्ससह डावाचे नेतृत्व केले. केन विल्यमसनने या डावात आपले 29 वे कसोटी शतक पूर्ण केले आणि अनेक महान खेळाडूंचे रेकॉर्ड धोक्यात आले. या डावात त्याने 205 चेंडूत 104 धावा केल्या.

केनचे 29 वे कसोटी शतक

दरम्यान, केन विल्यमसनचे (Kane Williamson) 95व्या कसोटीतील हे 29वे शतक होते. यासह त्याने विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी शतकांची बरोबरी केली. आता तो या दोन दिग्गजांचा विक्रम मोडण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. एवढेच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील त्याचे हे 7 वे शतक ठरले.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो संयुक्तपणे पाचवा फलंदाज ठरला. त्याने डब्ल्यूटीसीमध्ये प्रत्येकी 7 शतके झळकावणाऱ्या बेन स्टोक्स, रोहित शर्मा आणि उस्मान ख्वाजा यांची बरोबरी केली. तर विल्यमसनने सलग चौथ्या कसोटीत शतक झळकावले.

यापूर्वी, त्याने फेब्रुवारी 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध (वेलिंग्टन) आणि मार्च 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये (ख्रिस्टचर्च आणि वेलिंग्टन) शतके झळकावली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

स्टीव्ह स्मिथ - 32

जो रुट - 30

केन विल्यमसन - 29

विराट कोहली- 29

डेव्हिड वॉर्नर - 25

WTC मध्ये सर्वाधिक शतके

जो रुट- 12

मार्नस लॅबुशेन- 11

स्टीव्ह स्मिथ-9

बाबर आझम- 8

केन विल्यमसन - 7

बेन स्टोक्स - 7

रोहित शर्मा- 7

उस्मान ख्वाजा- 7

दुखापतीनंतर शानदार पुनरागमन

केन विल्यमसनसाठी गेले काही महिने खास राहिलेले नाहीत. केन गुडघ्याच्या दुखापतीमुळे मार्च-एप्रिलमध्ये IPL 2023 च्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

2023 च्या विश्वचषकातील (World Cup) पहिले दोन-तीन सामने तो खेळू शकला नाही. त्यानंतर परत येताच पहिल्या सामन्यात दुखापत झाली आणि अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने तो बाहेर पडला. विश्वचषकाच्या अखेरीस त्याने उपांत्य फेरीपर्यंत संघात पुनरागमन केले. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून रेड बॉल क्रिकेटमध्येही त्याने आपली छाप सोडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT