South Africa Team Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IRE: दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, कागिसो रबाडा टी-20 मालिकेतून आउट

South Africa Team: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे.

दैनिक गोमन्तक

SA Vs IRE: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही देशांदरम्यान दोन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या दोन सामन्यांच्या T20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ब्रिस्टलमध्ये आल्यानंतर संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की, कागिसो रबाडा या मालिकेत खेळू शकणार नाही.

दरम्यान, कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) घोट्याला दुखापत झाली आहे. तर दुसरीकडे, या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या (England) आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यापूर्वी तो बरा होईल असेही सांगण्यात आले आहे. त्याला दीर्घकाळ विश्रांती दिली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

दुसरीकडे, T20 विश्वचषकातील (T20 World Cup) तयारीसाठी दक्षिण आफ्रिकेने (South Africa) जुलैमध्ये इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी त्यांच्या वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

हेरिटेज संरक्षणात विलंब भोवणार, केंद्रीय प्राधिकरणावर कोर्टाची नाराजी; अधिकाऱ्यांनाही इशारा

SCROLL FOR NEXT