KL Rahul and Athiya Shetty Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul-Athiya Shetty Marriage: के. एल. राहुल अथियासोबत नव्या इनिंगसाठी सज्ज... 'ही' तारीख निश्चित्त

मनिष मल्होत्राने डीझाईन केलेला ड्रेस परिधान करणार अथिया

Akshay Nirmale

KL Rahul-Athiya Shetty Marriage: भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल बांगलादेशविरुद्धच्या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत व्यस्त असेल आणि त्यानंतर पुढील महिन्यात तो आपली 'नवी इनिंग' सुरू करण्याच्या तयारीत व्यस्त असेल. केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि सोशल मीडियातुनही त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अनेकदा दिसून आले आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी जानेवारीत लग्न करणार आहेत. 21 नेवारीपासून विवाह सोहळा सुरू होणार असून 23 जानेवारीपर्यंत चालणार आहे. दोघांच्या कुटूंबियांनी लग्नाची तयारीही सुरू केली आहे. हे कपल डिसेंबरच्या शेवटी मित्र परिवाराला पत्रिका देण्यास प्रारंभ करू शकते. जवळच्या नातेवाईकांना मात्र आत्तापासूनच मेसेज सुरू झाले आहेत. थिया शेट्टीच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या या तारखांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. तथापि, दोघांचे लग्न दक्षिण भारतीय परंपरांनुसार होणार असून त्यात हळद, मेहंदी, संगीत या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

सुनील शेट्टीच्या आलिशा जहाँ या घरामध्येच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. राहुल आणि अथिया दोघेही डिझायनर आउटफिट्समध्ये दिसणार आहेत. अथियाचा आवडता डिझायनर मनीष मल्होत्रा ​​तिच्या लग्नाचा लेहेंगा तयार करत आहे. राहुलचा डिझायनर मनीष मल्होत्रा ​​असेल की आणखी कोणी, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

काही वर्षांपूर्वी राहुल-अथिया यांनी मुंबईत समुद्राकिनारी एक आलिशान घर घेतले होते. लग्नानंतर हे जोडपे तिकडे शिफ्ट होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, लग्नाच्या तयारीसाठी राहुल 18 ते 24 जानेवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो. त्याने नुकताच बीसीसीआयकडे पर्सनल रजेसाठी अर्ज केला होता, आणि बीसीसीआयने त्याची रजा मंजूर केल्याचेही समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT