Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Video: किंग कोहलीची बातच न्यारी! विराटला भेटताच विंडीज क्रिकेटरच्या आईच्या डोळ्यातही आले आनंदाश्रू

Virat Kohli Video: विंडिज क्रिकेटरची आई विराटने 76वे शतक झळकावल्यानंतर त्याला भेटली होती, त्यानंतर तिला भावना अनावर झाल्या.

Pranali Kodre

Joshua Da Silva's mother meet Virat Kohli : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून त्रिनिदादला कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी केली.

दरम्यान, त्याने हा दिवस आणखी एका व्यक्तीसाठी खास बनवला. ही व्यक्ती म्हणजे वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक जोशुआ डा सिल्वाची आई.

या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ हॉटेलकडे परत जात असताना विराटला जोशुआची आई भेटली. तिने त्याला मिठी मारली आणि तिचा आनंद व्यक्त केला. तसेच विराटनेही तिच्याशी हसून संवाद साधला आणि फोटोही काढला. यावेळी जोशुआ देखील तिच्याबरोबर उपस्थित होता.

जोशुआची आई विराटची मोठी चाहती आहे. त्यांच्यातील हा प्रेमळ गोड क्षण पत्रकार विमल कुमार यांनी टीपला आहे. त्यांनी घेतलेल्या व्हिडिओमध्ये जोशुआच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. तसेच तिच्या डोळ्यातून विराटला भेटल्यानंतर आनंदाश्रूही वाहिले.

तिने विराटला भेटल्यानंतर विमल कुमार यांना सांगितले की 'विराट आमच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळए माझ्यासाठी त्याला भेटणे हा एक सन्मान होता. माझा मुलगा आणि तो एकाच सामन्यात खेळत आहेत.'

जोशुआनेही विराटला आईबद्दल सांगितले होते

दरम्यान, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराट फलंदाजी करत असताना मागे यष्टीरक्षण करणाऱ्या जोशुआने त्याला त्याच्या आईबद्दल सांगितले होते. त्यांच्यातील संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला होता.

जोशुआ विराटला म्हणाला होता की 'माझ्या आईने मला फोन केला आणि सांगितले की ती विराट कोहलीसाठी सामना पाहायला येत आहे. माझा विश्वासच बसत नव्हता.'

विराटने ठोकले 76 वे शतक

विराटसाठी हा सामना अनेक अर्थांनी खास आहे. हा त्याचा कारकिर्दीतील 500 वा सामना आहे. तसेच त्याने या सामन्यात शतकही ठोकले. विराटने भारताकडून पहिल्या डावात 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या. हे विराटचे 29 वे कसोटी शतक आणि 76 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. तसेच तो 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू आहे.

भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या. या डावात विराटच्या शतकाव्यतिरिक्त रोहित शर्माने 80 धावांची, यशस्वी जयस्वालने 57 धावांची, रविंद्र जडेजाने 61 धावांची आणि आर अश्विनने 56 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 

तसेच दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 41 षटकात 1 बाद 86 धावा केल्या आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT