आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय संघाचा पुढचा सामना यजमान असणाऱ्या न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 10 मार्च रोजी हॅमिल्टनमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताला न्यूझीलंड सारख्या संघाला पराजित करण्याची संधी असणार आहे. यातच दुसरीकडे, टीम इंडियाची (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला (Jhulan Goswami) नंबर वन होण्याची संधी असणार आहे. (Jhulan Goswami will be the highest wicket taker in the ICC Womens World Cup)
दरम्यान, झुलन गोस्वामी पहिल्या क्रमांकाची विकेट घेणारी गोलंदाज ठरणार आहे. ती ICC महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनण्यापासून फक्त 2 पावले दूर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात, दोन फलंदाज बाद होताच ती विश्वचषकाच्या खेळपट्टीवर सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरेल.
तसेच, झुलन गोस्वामीने सध्या 29 सामन्यांत 38 बळी घेतले असून ती यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ती चौथ्या क्रमांकावर होती. विशेष म्हणजे विक्रम करण्यापासून 4 विकेट दूर होती. परंतु पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दोन विकेट घेतल्यानंतर आता तिच्या रेकॉर्डमध्ये दोन विकेट्सचं अंतर राहीलं आहे.
शिवाय, महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टनच्या नावावर आहे. 1982-1988 दरम्यान विश्वचषकात खेळलेल्या 20 सामन्यांत तिने 39 बळी घेतले होते. झुलन गोस्वामी तिला मागे टाकण्याची संधी असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.