Team India | India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज बाहेर, जाणून घ्या कारण

दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघातून अनुभवी वेगवान गोलंदाज बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीला सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघातून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला मुक्त करण्यात आले आहे.

उनाटकटला रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. उनाडकट सौराष्ट्र संघाचा नियमित कर्णधार आहे आणि सौराष्ट्र संघ यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना 16 फेब्रुवारीपासून कोलकातामध्ये होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार उनाडकटला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळायचा होता. त्याने याबद्दल भारतीय संघव्यवस्थापनाकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार संघव्यवस्थापन आणि भारतीय निवड समीतीने चर्चा करून उनाडकटला दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून मुक्त केले आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे गोलंदाज उनाडकटला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यताही कमी होती. याचाच विचार करून त्याने रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उनाडकटने यंद्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाकडून तीन सामने खेळले असून 13.64 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका हॅट्रिकचाही समावेश आहे. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्याच पहिल्याच षटकात हॅट्रिक घेतली होती. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 39 धावांत 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच सामन्यात त्याने 70 धावाही केल्या होत्या.

दरम्यान, उनाडकट सौराष्ट्र संघासाठी उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे अर्पित वसवडाने सौराष्ट्रचे नेतृत्व केले होते. पण आता उनाडकट अंतिम सामन्यात सौराष्ट्रचे नेतृत्व करताना दिसेल. त्याच्याच नेतृत्वाखाली 2019-20 रणजी ट्रॉफीचे विजेतेपद सौराष्ट्राने जिंकले होते.

विशेष म्हणजे त्यावेळी सौराष्ट्रने अंतिम सामन्यात बंगालला पराभूत करत विजेतेपद नावावर केले होते. यंदातही अंतिम सामन्याच सौराष्ट्र आणि बंगालच आमने-सामने येणार आहेत.

बंगाल-सौराष्ट्र अंतिम सामन्यात

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बंगालने मध्यप्रदेशला 306 धावांनी पराभूत केले, तर सौराष्ट्रने कर्नाटकला 4 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान बंगाल आणि सौराष्ट्र संघ रणजी ट्रॉफीसाठी आमने-सामने येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ...तर सुदिन, ‘मगो’बाबत वेगळा निर्णय

ISL 2026: 2 मिनिटे बाकी असताना गेलेला सामना बचावला! कर्णधार ठरला संकटमोचक; FC Goa चेन्नईयीन सामन्यात गोलबरोबरी

Ponda By Election: पक्षाचा आपण 'निष्ठावंत कार्यकर्ता'! विश्‍वनाथ दळवी करणार रितेश नाईक यांचा प्रचार; कार्यकर्त्यांच्या शंका दूर

VIDEO: 'युतीतील नेत्‍यांबाबत गांभीर्याने विधाने करणे आवश्‍‍यक'! सरदेसाईंबाबत युरींनी केलेल्‍या विधानांशी काँग्रेस सहमत नसल्याचे ठाकरेंकडून स्पष्ट

Tragic Death: ..आणखी एक बळी! आंघोळीसाठी नदीत गेला, तो आलाच नाही; म्हादई पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT