Football  Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवासमोर जमशेदपूरचे तुल्यबळ आव्हान

सामना नागोवा येथील मैदानावर होईल

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघ रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी उसळी घेण्यास इच्छुक आहे, पण रविवारी (ता. 24) त्यांना जमशेदपूरच्या तुल्यबळ आव्हानास सामोरे जावे लागेल. सामना नागोवा येथील मैदानावर होईल.

एफसी गोवाच्या खाती सध्या दोन लढतीतून तीन गुण आहेत. चेन्नईयीनला नमविल्यानंतर एफसी गोवास मागील लढतीत बंगळूर एफसीकडून हार पत्करावी लागली. जमशेदपूरने दोन लढतीतून चार गुणांची कमाई केली आहे. मुंबई सिटीला नमविल्यानंतर मागील लढतीत त्यांनी भरपाई वेळेतील गोलमुळे चेन्नईयीन एफसीला गोलबरोबरीत रोखले.

बाणावली येथे रविवारी बंगळूर एफसी सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. ते हैदराबाद एफसीविरुद्ध खेळतील. आरएफ यंग चँप्स व एफसी गोवाला हरवून बंगळूरने सहा गुणांची कमाई केली आहे. त्यांच्या बेके ओरम व राहुल राजू यांनी प्रत्येकी दोन गोल केले आहेत. हैदराबादच्या खाती तीन गुण आहेत. केरळा (Kerala) ब्लास्टर्सकडून हार पत्करल्यानंतर हैदराबादच्या संघाने मागील सामन्यात आरएफ यंग चँप्सला नमवून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT