FC Goa in ISL Football:  Dainik Gomantak
क्रीडा

ISl Football: एफसी गोवाची नजर अग्रस्थानावर; जमशेदपूरविरुद्ध फातोर्ड्यात सोमवारी लढत

पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास संघाला मिळेल पोल पोझिशन

किशोर पेटकर

FC Goa in ISL Football: एफसी गोवा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पुन्हा एकदा अग्रस्थानी येण्यास इच्छुक आहे. सोमवारी (ता. 27) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूर एफसीविरुद्ध पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला पोल पोझिशन मिळेल.

सध्या आयएसएल स्पर्धेत अपराजित असलेल्या एफसी गोवाचे पाच लढतीनंतर चार विजय व एका बरोबरीसह 13 गुण आहे. शनिवारी केरळा ब्लास्टर्सने हैदराबाद एफसीला 1-0 असे हरविले, त्यामुळे केरळमधील संघाचे सध्या 16 गुण असून ते पहिल्या स्थानी आले आहेत.

एफसी गोवाने सोमवारी विजय नोंदविल्यास त्यांचेही 16 गुण होतील आणि गोलसरासरी सरस असल्यामुळे ते पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होतील. दुसरीकडे जमशेदपूरच्या कामगिरीत सातत्य नाही.

सहा लढतीनंतर एक विजय, दोन बरोबरी व तीन पराभवामुळे त्यांचे पाच गुण झाले आहेत. 5 ऑक्टोबर रोजी हैदराबादला एका गोलने नमविल्यानंतर जमशेदपूरने स्पर्धेत सामना जिंकलेला नाही.

स्पर्धेत सरस कामगिरी

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाने आतापर्यंत सरस कामगिरी नोंदविली आहे. त्यांनी अनुक्रमे पंजाब एफसी, ओडिशा एफसी, ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसीवर मात केली असून बंगळूर एफसीविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला.

होम आणि अवे मैदानावर प्रत्येकी दोन विजय नोंदविलेले असल्याने एफसी गोवा संघाचे सातत्य लक्षात येते.

लक्ष फक्त जमशेदपूर संघावर

मार्केझ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की ``स्पर्धेत आम्हाला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही अपराजित असलो, तरी लीगमध्ये एकूण 22 सामने खेळायचे आहे. सध्या आमचे लक्ष फक्त जमशेदपूरविरुद्धच्या लढतीवर केंद्रित आहे.

त्यांनी जास्त गोल नोंदवलेले नसले, तरी फारच कमी गोल स्वीकारले आहेत. जमशेदपूर संघ तांत्रिकदृष्ट्या चांगला खेळ आहे आणि त्यांचा बचाव भेदणे कठीण ठरते. तरीही, निर्धारित वेळेत गोल करण्यावर भर देताना विजयासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.``

आकडेवारीत सामना

  • उभय संघांत एकूण 16 लढती

  • एफसी गोवा व जमशेदपूरचे प्रत्येकी 6 विजय, 4 बरोबरी

  • गतमोसमात फातोर्ड्यात एफसी गोवा 3-0 फरकाने विजयी, अवे सामना 2-2 गोलबरोबरीत

  • एफसी गोवाने 9 गोल केले असून 3 गोल स्वीकारले आहेत, 3 लढतीत क्लीन शीट

  • जमशेदपूर एफसीने 4 गोल नोंदविताना 6 गोल स्वीकारले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT