ISL Football  Dainik Gomantak
क्रीडा

आयएसएल फुटबॉल : गोव्याचे क्लिफर्ड मिरांडा ओडिशाचे सहाय्यक प्रशिक्षक

एफसी गोवा संघानंतर नव्या संघाची जबाबदारी

Kishor Petkar

पणजी : गोमंतकीय मध्यरक्षक भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू क्लिफर्ड मिरांडा यांच्याकडे ओडिशा एफसीने मंगळवारी सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली. आगामी मोसमातील आयएसएल स्पर्धेत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना साह्य करतील.

क्लिफर्ड एक जुलैपासून कार्यभार स्वीकारतील असे ओडिशा एफसीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. गतमोसमापर्यंत 39 वर्षीय क्लिफर्ड एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. क्लिफर्ड यांनी सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने दिलेल्या योगदानाबद्दल एफसी गोवाने आभार मानले असून भावी कारकिर्दीसाठी त्यांना सुयश चिंतिले आहे.

धेंपो क्लबचे 15 वर्षे प्रतिनिधित्व

क्लिफर्ड यांनी धेंपो क्लबचे तब्बल 15 वर्षे प्रतिनिधित्व केले. या संघातर्फे त्यांनी राष्ट्रीय लीग, तसेच फेडरेशन करंडकही जिंकला. त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरवात सालसेत एफसीतर्फे झाली. चार वर्षांच्या कालावधीत जमशेदपूर येथील टाटा फुटबॉल अकादमीत त्यांची गुणवत्ता बहरली. स्पर्धात्मक फुटबॉलमधून ते 2017 मध्ये निवृत्त झाले.

2018 मध्ये ते एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. नंतर सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने 2019-20 मोसमात ते एफसी गोवा मुख्य संघात रुजू झाले. त्याच मोसमातील अखेरच्या टप्प्यात त्यांनी आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे हंगामी प्रशिक्षकपदही सांभाळले होते.

गोमंतकीय फुटबॉल मार्गदर्शकाविषयी

  • क्लिफर्ड मिरांडा यांचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 2005 ते 2014 कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व

  • 45 आंतरराष्ट्रीय सामने, 6 गोल

  • भारतातर्फे 2 वेळा सॅफ करंडक, तर 2008 मध्ये एएफसी चँलेंज कप जेतेपद

  • 2000-2015 या कालावधीत धेंपो क्लबतर्फे मैदानात

  • धेंपोकडून खेळताना 2 वेळा राष्ट्रीय साखळी, तर 3 वेळा आय-लीग, 1 वेळ फेडरेशन कप विजेतेपद

  • 2014 ते 2016 या कालावधीत आयएसएल स्पर्धेत खेळाडू या नात्याने एफसी गोवा आणि एटीके संघाचे प्रतिनिधित्व

  • 2019-20 मध्ये प्रशिक्षणातील एएफसी प्रो-डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT