ISL 2021 Once again Ishaan Lucky Super Sub FC Goa stop Chennaiyin due to injury goal from behind 
क्रीडा

ISL 2021: पुन्हा एकदा ईशान `लकी सुपर सब` एफसी गोवाने पिछाडीवरून इंज्युरी गोलमुळे चेन्नईयीनला रोखले

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : ईशान पंडिता पुन्हा एकदा एफसी गोवासाठी लकी सुपर सब ठरला. इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटास त्याने नोंदविलेल्या सणसणीत गोलमुळे एफसी गोवाने पराभव टाळण्यास यश मिळवत प्ले-ऑफ फेरीचा दावाही कायम राखला. त्यांनी चेन्नईयीन एफसीला 2-2 गोलबरोबरीत रोखत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएलएल) फुटबॉल स्पर्धेत पुन्हा तिसरा क्रमांक मिळविला. गोव्याचा संघ स्पर्धेत आता सलग 10 सामने अपराजित असून सलग सहावी बरोबरी त्यांनी नोंदविली. सामना शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला.

सामन्यातील 90+2व्या मिनिटास आल्बर्टो नोगेरोच्या शानदार असिस्टवर ईशानने गोल नोंदवत एफसी गोवास बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू या नात्याने त्याचा हा चौथा गोल ठरला. सामन्याच्या 66व्या मिनिटास अलेक्झांडर जेसूराज याच्या जागी प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी 22 वर्षीय ईशानला मैदानात धाडले होते.

ISL 2020-21: एटीके मोहन बागानची नजर अग्रस्थानावर जमशेदपूरविरुद्ध लढत;...

त्यापूर्वी, एफसी गोवाच्या बचावफळीतील चुकांचा लाभ उठवत चेन्नईयीनसाठी स्लोव्हाकियाच्या याकुब सिल्व्हेस्टर याने 13व्या, तर लाल्लियानझुआला छांगटे याने 60व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला होता. चेन्नईयीनचा कर्णधार एली साबिया याच्या हँडबॉलनंतर मिळालेल्या पेनल्टीवर 37 वर्षीय स्पॅनिश इगोर आंगुलो याने एफसी गोवाची 19व्या मिनिटास पिछाडी कमी केली होती. आंगुलोचा हा १२वा गोल ठरला.

एफसी गोवाची ही 17 लढतीतील नववी बरोबरी ठरली. त्यांचे आणि हैदराबादचे समान 24 गुण झाले आहेत. एफसी गोवाने (+5) सरस गोलसरासरीवर हैदराबादला (+4) चौथ्या स्थानी ढकलले आहे. 57वा वाढदिवस असलेल्या साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीचे आव्हान आटोपल्यात जमा आहे. त्यांचे 18 सामन्यानंतर 18 गुण झाले असून आठवा क्रमांक कायम आहे.

पूर्वार्धात गोलबरोबरी

सामन्याच्या तेराव्या मिनिटास स्लोव्हाकियन आघाडीपटू याकुब सिल्व्हेस्टर याने चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली. रीगन सिंग याने एफसी गोवाच्या बचावफळीस चकवा देत दिलेल्या पासवर याकुबने चेंडूवर नियंत्रण राखत एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याला चेंडू अडविण्याची संधी दिली नाही. मात्र एफसी गोवाने सहा मिनिटानंतर पिछाडी भरून काढली. सेवियर गामाच्या फटक्यावर चेंडू इगोर आंगुलोस मिळू नये या प्रयत्नात असलेला चेन्नईयीनचा कर्णधार एली साबियाने हँडबॉल साधला. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर आंगुलोने बरोबरीचा गोल केला. त्याचा पहिला फटका रेफरीने अमान्य केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ३७ वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकरने गोलरक्षक विशाल कैथचा बचाव भेदला. पूर्वार्धाची दोन मिनिटे बाकी असताना सिल्व्हेस्टरची फटका गोलपोस्टमुळे विफल ठरल्याने चेन्नईयीनची आघाडी घेण्याची संधी हुकली.

चेन्नईयीनची उत्तरार्धात आघाडी

एफसी गोवाच्या बचावफळीतील गलथानपणामुळे चेन्नईयीनने साठाव्या मिनिटास आघाडी घेतली. दोन मिनिटांपूर्वी दुखापतीमुळे अनुभवी बचावपटू आदिल खान याला मैदान सोडावे लागले, त्याचा फटका एफसी गोवास बसला. चेंडू अडविण्यास पुढे आलेला गोलरक्षक धीरज सिंग व बचावपटू सेरिटन फर्नांडिस यांच्यात गोंधळ उडाल्यानंतर चेंडूवर ताबा मिळवत लाल्लियानझुआला छांगटे याने चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली.

दृष्टिक्षेपात...

- चेन्नईयीनच्या याकुब सिल्व्हेस्टरचे 17 सामन्यांत 2 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 16 सामन्यात 12 गोल, 2 पेनल्टीवर

- लाल्लियानझुआला छांगटे याचे यंदा 18 लढतीत 2 गोल, एकंदरीत 76 आयएसएल सामन्यात 17 गोल

- एफसी गोवाचे स्पर्धेत सर्वाधिक 26 गोल

- बदली खेळाडू या नात्याने 7 सामन्यांत ईशान पंडिताचे 4 गोल

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोगेराच्या स्पर्धेत सर्वाधिक 8 असिस्ट

-  एफसी गोवा सलग 10 सामने अपराजित, 3 विजय, 7 बरोबरी

- चेन्नईयीन एफसी सलग 7 सामने विजयाविना, 4 बरोबरी, 7 पराभव

- स्पर्धेत यंदा एफसी गोवा, हैदराबाद व चेन्नईयीन यांच्या प्रत्येकी 9 बरोबरी
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT