Ishant Sharma and wife Pratima Singh Instagram
क्रीडा

Ishant Sharma: इशांतच्या घरी नव्या सदस्याचे आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली 'गुडन्यूज'

Ishant Sharma Daughter: इशांत शर्मा आणि त्याची पत्नी प्रतिमा सिंग आई-बाबा झाले आहेत.

Pranali Kodre

Ishant Sharma and wife Pratima Singh welcome first child :

भारतात सध्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेची धामधूम असतानाच भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माच्या घरी गोड बातमी आली आहे. इशांत शर्मा आणि त्याची पत्नी प्रतिमा सिंग यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

इशांत आणि बास्केटबॉलपटू असलेली प्रतिमा यांनी काही दिवसांपूर्वीच ते आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता त्यांनी शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सोशल मीडियावर त्यांना मुलगी झाल्याचे सांगितले.

इशांतने पोस्ट करत लिहिले आहे की 'एक नवी चिमुकली, आश्चर्याचे जग, आशा आणि स्वप्न सारं काही गुलाबी रंगात गुंडाळले आहे. आमच्या कुटुंबातील नव्या सदस्याची ओळख करून देताना खूप आनंद होत आहे.'

दरम्यान, इशांतच्या या पोस्टवर भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी त्याला आणि प्रतिमाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या चाहत्यांकडूनही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

तथापि, सध्या इशांत भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारताकडून अखेरचा सामना 25 ते 29 नोव्हेंबर 2021 दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे खेळला आहे. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तो नुकताच आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसला होता.

इशांतची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

भारताकडून 100 कसोटी सामने खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी इशांत देखील आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 105 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 311 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटीत 11 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच त्याने एकदा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे.

इशांतने वनडेत 80 सामने खेळले असून 115 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 14 सामने खेळले असून 8 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT