Ishan Kishan | Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Accident: जेव्हा चाहत्यांनी ईशान किशनला दिली पंतच्या अपघाताची बातमी...; पाहा व्हिडिओ

ईशान किशनला चाहत्यांकडून मिळालेली पंतच्या अपघाताची बातमी

Pranali Kodre

Rishabh Pant Accident: साल 2022 संपत असतानाच क्रीडा जगताला दोन धक्का देणाऱ्या बातम्या आल्या होत्या. दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे 29 डिसेंबर रोजी रात्री उशीरा निधन झाले. त्यातून क्रीडा चाहते बाहेर येत नाही, तोच 30 डिसेंबर रोजी सकाळी भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा गंभीर अपघात झाला. या दोन्ही घटनांबद्दल जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या.

(Ishan Kishan’s reaction after fans told about Rishabh Pant;s accident news)

ईशान किशनला चाहत्यांकडून समजली बातमी

दरम्यान, पंतच्या अपघात ज्यादिवशी झाला, त्यादिवशी रणजी ट्रॉफीमधील सामने सुरू होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू ईशान किशन त्याच्या राज्य संघाकडून म्हणजेच झारखंडकडून सर्विसेस विरुद्ध जमशेदपूरमधील किनन स्टेडियमवर रणजी सामना खेळत होता. त्यामुळे त्याला पंतच्या अपघाताबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.

पण, या सामन्यादरम्यान ज्यावेळी तो चाहत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी बाउंड्री लाईनजवळ आला, त्यावेळी चाहत्यांनी त्याला पंतच्या अपघाताबद्दल बातमी दिली. ते ऐकून ईशानने चकीत होऊन 'काय', अशी प्रतिक्रिया दिली.

त्यानंतर चाहत्यांनी त्याला पंतबद्दल आणखी माहिती दिल्यानंतर तो म्हणाला, 'काय बोलत आहात यार' अशी प्रतिक्रिया दिली. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पंतची प्रकृती स्थिर

पंत 30 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीवरून रुडकीला येत होता. त्यावेळी नारसन बॉर्डरजवळ डिव्हाडरला धडकल्याने त्याच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर पंत प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर आला. त्यावेळी त्याला त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसचे ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत यांनी मदत केली. दरम्यान, या अपघातात पंतच्या कारला आग लागल्याने ती पूर्णपणे जळाली.

या अपघातात पंतच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला दुखापती झाल्या आहेत. पण त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापती नसल्याचे समजले आहे. पण त्याच्या गुडघ्यामध्ये लिगामेंट टिअर आहेत. सध्या त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मात्र, आता पंतला त्याच्या दुखापतींमुळे पुढील कमीतकमी सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे.

ईशान खेळणार श्रीलंकेविरुद्ध

भारतीय संघाला 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठी ईशानची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो आता रणजी सामने खेळल्यानंतर भारतीय संघात सामील झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT