Shubman Gill | Ishan Kishan ICC
क्रीडा

SA vs IND: ईशान किशन कसोटी मालिकेतून बाहेर! BCCI केली बदली खेळाडूची घोषणा

Ishan Kishan: ईशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे, त्यामुळे त्याच्या जागेवर बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan ruled from Test Series against South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही वनडे मालिका 21 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका चालू होणार आहे.

मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन या मालिकेतून बाहेर झाला आहे.

त्याने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे या मालिकेतून विश्रांतीची विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली असून त्याला कसोटी मालिकेतून मुक्त करण्यात आले आहे.

त्याचमुळे त्याच्या जागेवर भारतीय संघाच्या निवड समितीने केएस भरतची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.

ईशान किशन या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी20 मालिकेसाठीही भारतीय संघाचा भाग होता. मात्र 10 ते 14 डिसेंबर दरम्यान झालेल्या या टी20 मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आता त्याने कसोटी मालिकेतूनही माघार घेतली आहे.

दरम्यान, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात त्याच्याव्यतिरिक्त केएल राहुल देखील यष्टीरक्षणासाठी पर्याय आहे. आता ईशानने माघार घेतल्याने केएल राहुल किंवा केएस भरत यांच्यापैकी एकजण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टीरक्षण करताना दिसेल.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान सेंच्युरियनला खेळला जाणार आहे. तसेच दुसरा सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीला 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनला खेळला जाईल.

असा आहे बदललेला भारतीय कसोटी संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT