Ishan Kishan  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

Ishan Kishan Breaks Yuvraj Singh Record: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज थरार कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगला आहे.

Manish Jadhav

Ishan Kishan Breaks Yuvraj Singh Record: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज थरार कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने आपल्या झंझावाती फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर ईशानने केवळ 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. तो 40 चेंडूत 77 धावांची विस्फोटक खेळी खेळून बाद झाला. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ईशानने एका खास विक्रमाला गवसणी घातली. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.

या एलिट क्लबमध्ये सामील होणारा ईशान किशन आता रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या पंक्तीत जाऊन बसला. 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी हा पराक्रम केला होता, तर विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये तब्बल चार वेळा अर्धशतके झळकावली आहेत. ईशान किशनने आता या दिग्गज फलंदाजांच्या यादीत आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. विशेष म्हणजे, ईशानने यावेळी अनेक जुने विक्रम मोडीत काढले.

ईशान किशनने या सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिलचा विक्रमही मोडला. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता ईशानच्या नावावर जमा झाला. त्याने पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत 42 धावा कुटल्या, तर यापूर्वी 2025 च्या आशिया चषकात दुबईमध्ये शुभमन गिलने 35 धावा केल्या होत्या. ईशानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

केवळ शुभमन गिलच नव्हे, तर ईशानने भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगलाही मागे टाकले. भारत-पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला. युवराज सिंगने 2012 मध्ये 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, तर ईशानने आज अवघ्या 27 चेंडूत ही किमया साधली. या यादीत मोहम्मद हाफीज (23 चेंडू) अजूनही अव्वल स्थानी आहे. ईशानच्या या खेळीमुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध भक्कम स्थिती प्राप्त झाली असून कोलंबोच्या मैदानावर ईशानचा हा 'रुद्रावतार' चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT