Ishan Kishan celebrates with the East Zone team after winning the Duleep Trophy 2026 Dainik Gomatak
क्रीडा

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

East Zone Duleep Trophy Title Win 2026: दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने साऊथ झोनचा पराभव करत 'चॅम्पियन' बनण्याचा मान पटकवला.

Manish Jadhav

East Zone Duleep Trophy Title Win 2026: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज आणि कर्णधार ईशान किशनने इतिहास रचला, ज्या क्षणाची वाट तब्बल 13 वर्षांपासून पाहिली जात होती. दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने साऊथ झोनचा पराभव करत 'चॅम्पियन' बनण्याचा मान पटकवला. हा फायनल सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावात मिळालेल्या प्रचंड आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनला अधिकृतरित्या विजेता घोषित करण्यात आले.

ईस्ट झोनच्या या ऐतिहासिक विजयात कर्णधार ईशान किशनचा वाटा सर्वात महत्त्वाचा ठरला. त्याने केवळ आपल्या तुफानी फलंदाजाच्या जोरावरच नव्हे, तर आपल्या चतुर आणि कणखर नेतृत्वाच्या जोरावर मोक्याच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन संघाला विजेतेपद मिळवून दिले.

फायनल सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ईस्ट झोनच्या संघाने पहिल्या डावात 708 धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. यामध्ये कर्णधार ईशान किशनने (Ishan Kishan) 270 धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना साऊथ झोनचा पूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 336 धावांवर गारद झाला. साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने 99 धावांची झुंजार खेळी खेळली खरी, पण ती संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी अपुरी ठरली.

पहिल्या डावात 372 धावांची भलीमोठी आघाडी मिळाल्यानंतर ईशान किशनकडे साऊथ झोनला फॉलोऑन देण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, त्याने स्वतः पुन्हा फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ईस्ट झोनने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 388 धावा केल्या असताना सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ईस्ट झोन चॅम्पियन बनला.

यापूर्वी, ईशान किशनच्याच नेतृत्वाखाली झारखंड संघाने 2025 मध्ये पहिल्यांदाच 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी' जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. विशेष म्हणजे सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलप्रमाणेच या दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्येही ईशान किशनलाच 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ईशानच्या नेतृत्वाखालील सर्वात खास बाब म्हणजे, त्याने आतापर्यंत तब्बल 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले.

यापैकी 8 सामन्यांत संघाने विजय मिळवला, तर 8 सामने अनिर्णित राहिले. म्हणजेच, कर्णधार म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ईशान किशनने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, जो स्वतःतच एक अत्यंत दुर्मिळ आणि भन्नाट विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT