Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ईशान किशनने केला मोठा कारनामा, सचिन-रोहितच्या स्पेशल क्लबमध्ये धाकड 'एन्ट्री'

Ishan Kishan Record: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करुन मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

Manish Jadhav

Ishan Kishan Record: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करुन मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. मुंबई आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 26 मे रोजी क्वालिफायर-2 सामना खेळवला जाईल.

यादरम्यान, लखनऊविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनने मोठी कामगिरी केली. तो सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.

ईशान किशनने ही कामगिरी केली

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ईशान किशनला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 3 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या, मात्र या धावा करत त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.

अशी कामगिरी करणारा तो संघाचा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा (Rohit Sharma), अंबाती रायडू, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे. किशनने 74 सामन्यात 2003 धावा केल्या आहेत.

ईशान किशनची आयपीएल कारकीर्द

ईशान किशनच्या आयपीएल (IPL) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 90 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या 2324 धावा आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 15 अर्धशतकेही झळकली आहेत.

त्याने आतापर्यंत 220 चौकार आणि 103 षटकार मारले आहेत. सध्याच्या आयपीएल सीझनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 15 मॅचमध्ये 454 धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने 3 अर्धशतकही ठोकले आहेत. चालू मोसमात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा तो सूर्यकुमारनंतरचा दुसरा फलंदाज आहे.

क्वालिफायर-2 मध्ये एमआय-जीटीचा सामना

क्वालिफायर-2 गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

एकीकडे, मुंबई इंडियन्स त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकून आली आहे, तर हार्दिक पांड्याच्या गतविजेत्या गुजरातला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT