Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: इशान किशननं भारताला तारलं, पण केएल राहुलची डोकेदुखी मात्र वाढली

Ishan Kishan: आशिया चषक स्पर्धेत शनिवारी पाकिस्तानविरुद्ध इशान किशनने त्याच्या अर्धशतकी खेळीने छाप पाडली आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan claim to cement his place in India Cricket team :

आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान सामना शनिवारी पहिल्या डावानंतर रद्द झाला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर संपला. 

दरम्यान, भारताकडून इशान किशनने अर्धशतकी खेळी करत अनेकांना प्रभावित केले. पण असे असले तरी केएल राहुलची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

सध्या ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशन, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा आहे. त्यातही आशिया चषकासाठी तरी इशान किशन आणि केएल राहुल यांना भारतीय संघव्यवस्थापनाकडून पहिली पसंती मिळाली आहे.

परंतु, केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने साखळी फेरीसाठी तो उपलब्ध नाही. अशात इशानने त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध भरताची वरची फळी कोलमडल्यानंतर भारतीय संघ 4 बाद 66 अशा परिस्थितीत असताना हार्दिक पंड्याबरोबर 138 धावांची भागीदारी केली.

तो 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावांची खेळी केली. त्याचे शतक 18 धावांनी थोडक्यात हुकले. पण असे असले तरी त्याने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले असल्याने भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आपली दावेदारी प्रबळ केली आहे.

त्यामुळे आता केएल राहुलसमोरील आव्हान मात्र कठीण बनले आहे. तसेच तो मे महिन्यापासून स्पर्धात्मक क्रिकेटही खेळलेला नाही. त्याचमुळे पुनरागमनात तो कशी कामगिर करतो हे देखील आता पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण तो जर त्याची छाप पाडण्यात अपयशी ठरला, तर इशान त्याची जागा पक्की करू शकतो.

दरम्यान, इशान व्यतिरिक्त हार्दिक पंड्यानेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 90 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT