Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record: चालु वर्षात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या ईशानने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 8 वर्ष जुना मोठा विक्रम मोडीत काढला आणि नवा विश्वविक्रमी कीर्तिमान आपल्या नावावर केला.

Manish Jadhav

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record: एशियन गेम्स 2026च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने श्रीलंकेचा 124 धावांच्या मोठ्या फरकाने दारुण पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता 3 ऑक्टोबर रोजी गोल्ड मेडलसाठी भारताची ऐतिहासिक अंतिम लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या एकतर्फी सामन्यात भारताकडून युवा यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनने तुफानी फटकेबाजी करत शानदार नाबाद 80 धावांची खेळी खेळली. चालु वर्षात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या ईशानने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 8 वर्ष जुना मोठा विक्रम मोडीत काढला आणि नवा विश्वविक्रमी कीर्तिमान आपल्या नावावर केला.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या आयसीसी रॅंकिंगमध्ये सध्या नंबर-वन असलेल्या ईशान किशनने या सामन्यात कठीण प्रसंगी फलंदाजीला येत संघाचा डाव सावरला आणि नाबाद 80 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळीसह ईशान आता भारताकडून (India) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाचव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवणारा नंबर-1 फलंदाज बनला.

याआधी हा विक्रम स्टार फलंदाज मनीष पांडेच्या नावावर होता, ज्याने 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनच्या मैदानावर नाबाद 79 धावांची खेळी खेळली होती. यादीत यानंतर भारताचे दिग्गज खेळाडू जसे की, युवराज सिंह (77 धावा), हार्दिक पांड्या (71 धावा) आणि फिनिशर रिंकू सिंह (69 व 68 धावा) यांचा समावेश होतो. ईशानच्या या स्फोटक आणि विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले होते.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली एशियन गेम्समध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण सामन्यात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्ध धावांच्या फरकाने भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताचा श्रीलंकेविरुद्धचा सर्वात मोठा विजय 93 धावांचा होता, जो 2017 मध्ये कटक येथे नोंदवला गेला होता. तसेच, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत होण्याची श्रीलंकेची ही तिसरी वेळ ठरली, ज्यामुळे भारतीय संघाचा हा विजय क्रिकेट वर्तुळात ऐतिहासिक मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT