IPL match betting Goa Dainik Gomantak
क्रीडा

Illegal IPL Betting: गोवा पोलिसांकडून आरोपी 'हिट विकेट'! कळंगुटमध्ये 1 लाखांहून अधिक बेटिंगचा मुद्देमाल जप्त

illegal betting Calangute: बागा-कळंगुट येथे एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या या प्रकारात एकूण तिघांना अटक करण्यात आलीये

Akshata Chhatre

म्हापसा: देशात सध्या आयपीएलची धूम सुरु असतानाच गोवा पोलीस ठिकठिकाणहून क्रिकेटच्या बेटिंगवर पैसे लावणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करत आहे. सोमवार (दि.२१) रोजी झालेल्या कोलकत्ता आणि गुजरात त्यांच्या सामन्यावेळी कळंगुट येथून पोलिसांनी एका क्रिकेट बॅटिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय. बागा-कळंगुट येथे एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या या प्रकारात एकूण तिघांना अटक करण्यात आलीये.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बागा-कळंगुट इथे छापा टाकत त्यांनी सालदाणा गार्डन, फ्लॅट क्रमांक २०३ येथून तिघांना रंगेहाथ पकडलं आहे. रात्री १२:३५ ते २:४५ या सुमारास छापा टाकला असता पोलिसांच्या हाती कोलकत्ता आणि गुजरात यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्याच्यावेळी ऑनलाईन सट्टेबाजी करताना आरोपी हाती सापडले. हे तिन्ही आरोपी मध्य प्रदेशमधील असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

या छाप्यात अटक करणात आलेल्या आरोपींची नावं अंकित राठोड (वय ३४ वर्षे), बादल (वय ३२) आणि अजय (वय ३२ वर्षे) अशी आहेत. या छाप्यातून पोलिसंनी एक लॅपटॉप, सात मोबाईल फोन असा एकूण १,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

जीडीडीपीजी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक आणि एसडीपीओ विश्वेश कर्पे करतायत.

ठिकठिकाणी पोलिसांची नजर

आयपीएल सुरु झाल्यापासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या बॅटिंग रॅकेटची ठिकाणं उध्वस्त करण्यासाठी गोवा पोलीस कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी वासवाडो बाणवली येथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या बेटिंगचा कोलवा पोलिसानी पर्दाफाश करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या.

यामध्ये इम्रान बल्लारी (२८ ) व इस्माईल बेपारी (२८ ) यांना ताब्यात घेण्यात आलं. हे दोघेही मडगावच्या नावेली भागातील आहे. त्यांच्याकडील एक लॅपटॉप, पाच मोबाईल ,व अन्य सामुग्री मिळून अंदाजे ९० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नोकरी मागणारे नाही, देणारे बना! मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे गोव्यातील तरुणांना आवाहन

Goa ZP Election: तोरसेत भाजपमध्ये गटबाजी, विरोधकांनी आखली रणनीती; सर्वपक्षीय उमेदवार ठरविण्‍यासाठी रविवारी खास बैठक

Gasification Project Sonsodo: सोनसड्यावर उभारणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प, 10 टन क्षमता; मडगाव पालिकेने केली त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

Goa Weather: आला हिवाळा, आरोग्य सांभाळा! राज्यात पहाटे जाणवते थंडी, किमान तापमान 20 अंशांवर

Horoscope: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद! शनी संक्रमणामुळे 'या' 2 राशींच्या घरात येणार सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT