IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: कुठे आणि कसा पाहाणार लिलाव? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

आयपीएल 2023 लिलावाबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीगचे (आयपीएल) आत्तापर्यंत 15 हंगाम पूर्ण झाले आहेत. आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे.

हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाला 23 डिसेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच हा लिलाव साधारण 7 तास चालण्याची शक्यता आहे.

19 खेळाडूंची किंमत 2 लाख...

आयपीएलने यापूर्वीच लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या 405 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या 405 खेळाडूंमध्ये 273 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच 132 परदेशी खेळाडू या यादीत सामील आहेत. या 132 खेळाडूंमध्ये 4 सहसदस्य संघांतील खेळाडूही आहेत.

तसेच 19 परदेशी खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 लाख रुपये ठेवली आहे. 2 लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू नाहीत. तसेच 11 खेळाडूंची मूळ किंमत दीड कोटी आहे. तसेच भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक मूळ किंमत मयंक अगरवाल आणि मनिष पांडे यांची आहे. त्यांची 1 कोटी मूळ किंमत आहे.

दहा संघात 87 खेळाडूंची जागा

दरम्यान, या लिलावापूर्वीच सर्व 10 संघांनी मिळून 163 खेळाडू संघात कायम केलेले आहेत. त्यामुळे 10 संघांमध्ये मिळून केवळ 87 खेळाडूंची जागा रिकामी आहे. त्यात 30 परदेशी खेळाडूंवर बोली लागू शकते. विशेष म्हणजे यंदा लिलावात केन विलियम्सन, सॅम करन, बेन स्टोक्स, जो रुट अशी काही मोठी नावंही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

आयपीएल लिलाव कुठे पाहाल?

आयपीएल 2023 लिलाव स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहाता येईल. स्टार स्पोर्ट्सने आयपीएल प्रसरणाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे टीव्हीवर त्यांच्या चॅनेलवर हा लिलाव पाहाता येईल.

तसेच डिजिटल प्रसरणाचे हक्क व्हियाकॉम 18 (Viacom 18) ने विकत घेतले आहेत. त्यामुळे आयपीएल लिलावाचे ऑनलाईन प्रसारण जियो टीव्ही ऍपवर (Jio Tv app) होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT