Ravindra jadeja shardul thakur ipl 2026 fight Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: आधी विकेटचं सेलिब्रेशन, मग 'नो बॉल'चा झटका; LIVE सामन्यात 'जड्डू' आणि 'लॉर्ड ठाकूर'मध्ये जुंपली! व्हिडिओ व्हायरल

Ravindra jadeja shardul thakur ipl 2026 fight: आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या प्लेऑफमधील चारही संघ आता निश्चित झाले आहेत.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या प्लेऑफमधील चारही संघ आता निश्चित झाले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफचे तिकीट पक्के केले. मात्र, या सामन्यातील निकालापेक्षा मैदानावर घडलेल्या एका वेगळ्याच घटनेची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राजस्थानचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांच्यात मैदानावर भर सामन्यात 'हाय व्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शार्दुलने चिडवले अन् अंपायरने फिरवली गेम!

नेमकी ही घटना राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीदरम्यान २० व्या षटकात घडली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर शेवटचे षटक टाकत होता, तर समोर रवींद्र जडेजा फलंदाजी करत था. पहिल्या तीन चेंडूंवर जडेजाने ४ धावा काढल्या.

चौथ्या चेंडूवर जडेजाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्याने त्याचा कॅच पकडला. जडेजा बाद झाल्याचा आनंद साजरा करत शार्दुलने थेट जडेजाच्या समोर जाऊन 'फिस्ट पंप' (मुठ आवळून जल्लोष) करत त्याला चिडवले. जडेजा पॅव्हेलियनकडे परतणार इतक्यात अंपायरने तो चेंडू 'नो बॉल' घोषित केला आणि जडेजाला जीवदान मिळाले.

जडेजाचा शार्दुलला 'फिस्ट पंप' करत जशास तसे उत्तर

अंपायरच्या या निर्णयामुळे शार्दुलचा चेहेरा पाहण्यासारखा झाला होता, तर जडेजाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या सुवर्णसंधीचा फायदा घेत जडेजाने पुढच्या दोन चेंडूंवर सलग दोन खणखणीत चौकार ठोकले. एवढ्यावरच जडेजा थांबला नाही, तर षटक संपल्यानंतर तो थेट शार्दुल ठाकूरजवळ गेला आणि शार्दुलने जसा जल्लोष केला होता, अगदी तसाच 'फिस्ट पंप' त्याच्या तोंडासमोर करत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

शार्दुलने त्याला हसत-हसत असे न करण्यास सांगितले. भारतीय संघातील या दोन खास मित्रांमधील हा मजेशीर आणि टॉम अँड जेरीसारखा वाद चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

राजस्थान प्लेऑफमध्ये; २६ मे पासून रंगणार थरार

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ८ बाद २०५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत ९ बाद १७५ धावांवरच रोखला गेला. या ३० धावांच्या विजयामुळे राजस्थानने १६ गुणांसह प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला, तर मुंबईचा संघ नवव्या स्थानावर राहून स्पर्धेतून बाहेर पडला.

दरम्यान, आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ फेरीला २६ मे पासून सुरुवात होत आहे. क्वालिफायर-१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. तर २७ मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. २९ मे रोजी क्वालिफायर-२ आणि ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये महाअंतिम सामना खेळवला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

SCROLL FOR NEXT