Virat Kohli and Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

IPL 2026 Mumbai heat : रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन्ही संघांतील काही खेळाडूंना याचा फटका बसला.

गोमंतक ऑनलाईन टीम

IPL Players Heat Exhaustion : महाराष्ट्रासह मुंबईतील वाढती उष्णता आयपीएल खेळाडूंना मारक ठरत आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन्ही संघांतील काही खेळाडूंना याचा फटका बसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम झाला.

मुंबईतील सध्याचे तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. खेळाडूंवर वाढत्या आर्द्रतेचा परिणाम होत आहे. सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होत असल्याने उन्हाचा त्रास होत नाही, पण सत्तरीकडे झुकलेल्या आर्द्रतेचा फटका बसत आहे.

गोलाकार रचनेत असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या गॅलरी पाठीमागून बंद आहेत. समुद्राकडून येणारे वारे वाहून पुढे जाण्यासाठी दोन्ही बाजूला जाळी आहे. परंतु स्टेडियममध्ये एकाच वेळी उपस्थित असलेल्या सुमारे ३५ हजार प्रेक्षकांमुळे मैदानातील तापमान आणि आर्द्रता यांमध्ये वाढ होत आहे.

वयाची पस्तिशी पार झालेला विराट कोहली तंदुरुस्तीबाबतीत सर्वात पुढे असतो, परंतु रविवारच्या सामन्यात १५ षटके फलंदाजी केल्यानंतर तो क्षेत्ररक्षणास उतरला नाही. गुडघा दुखापतीचा त्रास झाल्याचे नंतर सांगण्यात आले.

मुंबईतील असे चढ-उतार होणारे हवामान मुंबकर रोहित शर्मासाठी नवे नाही. अशा हवामानात तो अनेकदा खेळलाही आहे, परंतु रविवारी २० षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर फलंदाजी करताना मांडीचा स्नायू दुखावला. हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शरीरातील पाणी कमी झाल्यावर असा त्रास होत असतो.

हार्दिक पंड्या मैदानावर ऊर्जा दाखवत होता, परंतु एका षटकात गोलंदाजी करताना मध्येच चमक आल्यामुळे त्याला काही काळ उपचार घ्यावे लागले. परंतु तो सावरत तो पुन्हा खेळण्यास सज्ज झाला.

बंगळूर संघाचा वेगवान गोलंदाज रसिक सलाम याला त्याचे तिसरे षटक पूर्ण करता आले नाही. पोटरीचे स्नायू दुखावत असल्यामुळे त्याने या षटकात तीनदा उपचार घेतले, तरीही त्याला षटक अर्धवट सोडावे लागले. रोहितनेही उपचारासाठी बराच वेळ घेतला, परंतु त्यालाही जखमी निवृत्त होऊन मैदान सोडावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT