Mayank Dagar
Mayank Dagar Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: शेवटच्या क्षणी RCB ने खेळला मोठा डाव! स्टार फिरकीपटू विराटच्या संघात सामील

Manish Jadhav

RCB, IPL 2024: आयपीएल 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आरसीबीने स्टार अष्टपैलू शाहबाज अहमदला ट्रेड करुन सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू मयंक डागरचा संघात समावेश केला आहे. रिपोर्ट्सनुसार, आरसीबीने हा बदल शेवटच्या क्षणी म्हणजेच ट्रेड विंडो बंद होण्याच्या आधी केला आहे.

'क्रिकबझ'नुसार, आरसीबीने (RCB) शेवटच्या क्षणी हा बदल केला आहे. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या शाहबाज अहमदच्या जागी आरसीबीने मयंक डागरचा संघात समावेश केला आहे. बंगळुरुने 2.4 कोटी रुपयांमध्ये शाहबाज अहमदला 2022 मध्ये त्यांच्या संघाचा भाग बनवले होते. दुसरीकडे, मयंक डागरला 2023 च्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने 1.80 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले होते.

दरम्यान, 2023 चा हंगाम शाहबाज अहमदसाठी खूप वाईट गेला. त्याने 10 सामन्यात फलंदाजी करताना केवळ 42 धावा केल्या. याशिवाय, गोलंदाजीत एकच विकेट मिळवली होती. 2023 च्या आयपीएल (IPL) हंगामातून पदार्पण करणाऱ्या मयंक डागरने या स्पर्धेत हैदराबादसाठी फक्त तीन सामने खेळले, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना केवळ 1 बळी घेतला होता. तथापि, या काळात त्याची इकॉनॉमी 7.55 होती, जी टी-20 फॉरमॅटच्या दृष्टीने चांगली आहे. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी हा ट्रेड कितपत यशस्वी होतो हे पाहणे महत्त्वाचे असेल.

दुसरीकडे, शाहबाज अहमदने आत्तापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या 28 वर्षीय शाहबाज अहमदने 3 वनडे आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर 27 वर्षीय मयंक डागरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही.

2023 चा आयपीएल हंगामही आरसीबीची अत्यंत वाईट गेला

दरवर्षीप्रमाणे, 2023 चा आयपीएल हंगामही आरसीबीची अत्यंत वाईट गेला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी टॉप-4 साठी पात्र ठरु शकला नाही. 14 पैकी 7 लीग सामने जिंकणारा RCB गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहून स्पर्धेतून बाहेर पडला होता. विशेष म्हणजे, RCB हा आयपीएल संघांपैकी एक आहे, ज्यांनी अद्याप एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao House Demolition Case: पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी 'फैसला'; सरकारी वकिलांचा युक्तीवाद पूर्ण!

Goa Todays Live Update: आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी निवाडा

Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले

Goa Police: तब्बल ६०० जणांविरुद्ध कारवाई; उत्तर गोवा पोलिसांची धडक मोहीम

उसगावात मुसळधार पाऊस, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचला; वाहतूक बंद!

SCROLL FOR NEXT