trent boult gifts his jersey to a fan after rajasthan royals qualify for ipl 2022 final Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024 स्पर्धेत लागू होणार 'हा' नवा नियम; कमिन्स, स्टार्कसारख्या गोलंदाजांना होणार फायदा

IPL 2024 New Rule: आयपीएल 2024 स्पर्धेत गोलंदाजांना फायदा होईल असा एक नियम लागू करण्यात येणार आहे.

Pranali Kodre

IPL 2024 New Rule bowlers can bowl two bouncers an over

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सध्या सुरु झाल्या आहेत. आयपीएलच्या या 17 व्या हंगामासाठी 19 डिसेंबर 2023 रोजी लिलावही झाला. याचदरम्यान, एक महत्त्वाचा नियम आयपीएल 2024 स्पर्धेत लागू होणार असल्याचे म्हटले जात असून हा नियम गोलंदाजांना मदत करणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 स्पर्धेत गोलंदाजाला एका षटकात दोन बाऊंसर टाकण्याची संधी असणार आहे. त्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक होईल. या नियमाचा सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतही वापर करण्यात आला होता.

या नियमाबद्दल सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की 'एका षटकात दोन बाऊंसर खूप फायदेशीर ठरणार आहेत.'

'उदाहरणार्थ जर मी एक स्लोअर बाऊंसर टाकला, तर याआधी फलंदाजाला माहित असायचे की यापुढे मी बाऊंसर टाकणार नाही. पण आता मी माझ्या षटकाच्या सुरुवातीला स्लोअर बाऊंसर टाकला, तरी मी नंतरही अजून एक टाकू शकतो. त्यामुळे जो फलंदाज बाऊंसर विरुद्ध कमजोर आहे, त्याला त्यावर काम करावे लागेल. हा छोटा बदल आहे, पण मोठा प्रभाव पाडू शकतो.'

दरम्यान, गेल्यावर्षी आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू केला होता. या नियमानुसार संघांना सामन्यादरम्यान एक खेळाडू बदलता येत होता.

यासाठी प्लेइंग इलेव्हनबरोबरच चार राखीव खेळाडूंची नावे नाणेफेकीनंतर संघांना सुपूर्त करावी लागत होती. या 4 राखीव खेळाडूंमधून एकाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामन्यात सामील करता येत होते. हा नियम आयपीएल 2024 हंगामातही लागू होणार आहे.

72 खेळाडूंवर बोली

दरम्यान, आयपीएल 2024 लिलावात एकूण 72 खेळाडूंवर बोली लागली, ज्यातील 30 परदेशी खेळाडू आहेत. तसेच 72 खेळाडूंवर मिळून 2,30,45,00,000 रुपये खर्च करण्यात आला. तसेच 39 खेळाडूंना 1 कोटीहून अधिक रकमेची बोली लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT