Quinton de Kock  Dainik Gomantak
क्रीडा

Quinton de Kock Catch: हवेत सूर मारत डी कॉकने एका हातात पकडला अविश्वसनीय कॅच, Video एकदा पाहाच

Pranali Kodre

Quinton de Kock Catch Video: शनिवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 58 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. या सामन्यात लखनऊने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. दरम्यान, लखनऊच्या विजयाबरोबरच या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने पकडलेला झेल चर्चेत राहिला.

डी कॉक हा एक उत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याचाच प्रत्यय तो लखनऊकडून या सामन्यात यष्टीरक्षण करणताना आला.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी पहिली विकेट अभिषेक शर्माच्या रुपात लवकर गमावली. पण नंतर अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठी चांगली भागीदारी करत होते. मात्र त्यांची भागीदारी डी कॉकने घेतलेल्या अप्रतिम झेल घेतल्याने तुटली.

झाले असे की सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी यश ठाकूर आला. त्याने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चौथ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि यष्टीच्या मागे गेला. यावेळी डी कॉकने डाव्या बाजूला वर उडी मारत एका हाताने झेल घेतला. त्याच्या या झेलाचा सध्या कौतुक होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून हेन्रक क्लासेनने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच अनमोलप्रीतने 36 धावांची खेळी केली, तसेच अब्दुल सामदने नाबाद 37 धावांची खेळी केली. लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनऊने 19.2 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केल्या. लखनऊकडून प्रेरक मंकडने सर्वाधिक 45 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावा केल्या. याशिवाय मार्कस स्टॉयनिसने 40 धावांची खेळी केली. हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT