SRH vs DC Dainik Gomantak
क्रीडा

SRH vs DC: पृथ्वी शॉ दिल्ली संघातून बाहेर, सर्फराजला संधी, पाहा Playing XI

IPL 2023 स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी 34 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघास सामना होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दिल्लीने पृथ्वी शॉ याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच सर्फराज खान आणि रिपल पटेल यांना दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तसेच हैदराबादने त्यांच्या संघात कोणताही मोठा बदल केलेला नाही.

या सामन्यासाठी हैदाराबादने प्लेइंग इलेव्हमध्ये हॅरी ब्रुक, कर्णधार एडेन मार्करम, हेन्रिक क्लासेन आणि मार्को यान्सिन यांना संधी दिली आहे. तसेत दिल्लीने कर्णधार डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श आणि एन्रिच नॉर्किया या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी चार परदेशी खेळाडूंना खेळवले असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंना वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी सनरायझर्स हैदराबादने राखीव खेळाडूंमध्ये नितीश रेड्डी, विवरांत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, राहुल त्रिपाठी यांची निवड केली आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमार, ललित यादव, प्रविण दुबे, चेतन साकारिया आणि यश धुल यांची राखीव खेळाडूंमध्ये निवड केली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्करम (कर्णधार), मयंक अगरवाल, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, सर्फराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एन्रिच नॉर्किया कुलदीप यादव, इशांत शर्मा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT