RR vs PBKS Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाब-राजस्थान आमने-सामने! अशी आहे दोन्ही संघांची Playing XI

RR vs PBKS: आयपीएल 2023 स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जात आहे.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील आठवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जात आहे. हा सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे होत असून हा राजस्थानचा घरचा सामना आहे.

दरम्यान, या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

त्यामुळे राजस्थानकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, जॉस बटलर आणि ट्रेंट बोल्ट हे परदेशी खेळाडू खेळताना दिसतील, तर पंजाबकडून भानुका राजपक्षे, सॅम करन, सिकंदर रझा आणि नॅथन एलिस हे परदेशी खेळाडू खेळताना दिसतील.

पण, दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी चार परदेशी खेळाडू खेळवल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंनाच वापरावे लागणार आहे.

तसेच या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवले आहेत. पंजाबने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले होते, तर राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले होते. त्यामुळे आता आजच्या सामन्यात विजय मिळवत आपली विजयी लय कोण राखणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.

  • पंजाब किंग्स - शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT