Faf du Plessis Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: शुभमन गिलचं शतक अन् RCB चा स्वप्नभंग! गुजरातच्या विजयानं मुंबई Playoff मध्ये

रविवारी गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

गुजरातच्या या विजयाने बेंगलोरचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच त्यामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला असून तो प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला.

या सामन्यात बेंगलोरने 198 धावांचे आव्हान गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने 19.1 षटकात पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिलने शतकी खेळी केली.

गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. पण साहाला तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने 12 धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर गिलला विजय शंकरने चांगली साथ दिली.

विजय शंकर आणि शुभमन गिल यांच्यात 123 धावांची भागीदारीही झाली. पण ही भागीदारी अखेर १५ व्या षटकात विजयकुमार वैशाखने तोडली. त्याने शंकरला 53 धावांवर बाद केले. शंकरने त्याच्या या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्यानंतर 16 व्या षटकात दसून शनका शुन्यावर बाद झाला, तर 18 व्या षटकात डेव्हिड मिलरला 6 धावांवर सिराजने माघारी धाडले. पण गिलने एका बाजूने डाव सांभाळत विजयापासून संघाला दूर जाऊ दिले नाही.

त्यानंतर त्याने अखेरच्या षटकात षटकार ठोकत त्याचे शतक पूर्ण करण्याबरोबरच संघाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. गिलने 52 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले.

बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच विजयकुमार वैशाख आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केलेली. त्यांनी सलामीला 67 धावांची भागीदारीही केली. पण डू प्लेसिसला 8 व्या षटकात नूर अहमदने 28 धावांवर बाद केले.

त्याच्या पुढच्या दोन षटकात बेंगलोरने ग्लेन मॅक्सवेलची 11 धावांवर आणि महिपाल लोमरोरची 1 धावेवर विकेट गमावली. पण त्यानंतर मायकल ब्रेसवेलने विराटची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला 14 व्या षटकात मोहम्मद शमीने 26 धावांवर बाद कले. त्यानंतर पुढच्याच षटकात दिनेश कार्तिक भोपळाही न फोडता बाद झाला.

मात्र, एका बाजूने विकेट जात असताना विराटने दुसरी बाजू सांभाळली होती. त्याला नंतर अनुज रावतने चांगली साथ दिली. त्यांची भागीदारी रंगत असताना विराटने त्याचे आयपीएलमधील सातवे शतकही पूर्ण केले. त्याच्यात आणि अनुज यांच्यात 64 धावांची नाबाद भागीदारी झाली.

त्यामुळे बेंगलोरला 20 षटकात 5 बाद 197 धावा करता आल्या. बेंगलोरकडून विराटने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. तसेच अनुज रावत 23 धावांवर नाबाद राहिला.

गुजरातकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT