Mumbai Indians New Head Coach
Mumbai Indians New Head Coach Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मार्क बाऊचरची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

दैनिक गोमन्तक

आयपीएलचा पाच वेळा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स टिमची ताकद अधिक वाढणार आहे. महिला जयवर्धने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर मुंबई टिमने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मार्क बाऊचरची टिमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. बाऊचरने काही दिवसांपूर्वी आगामी टी-20 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

* मार्क बाऊचर काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मार्क बाऊचर म्हणाला, "एमआयच्या मुख्य प्रशिक्षकपद नियुक्ती होणं, माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. फ्रँचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरीने जगभरात खेळणाऱ्या अन्य फ्रँचायझीपेक्षा अधिक यशस्वी असल्याचे सिद्ध केलं आहे. मी आव्हानाची वाट पाहतो आणि निकालांच्या गरजेचा आदर करतो. हे उत्कृष्ट नेतृत्व आणि खेळाडू असलेले एक मजबूत युनिट आहे. मी या गतिमान घटकाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे.'

* आकाश अंबानीकडून मार्क बाऊचरचं स्वागत

मुंबई इंडियन्सच्या संघात मार्क बाऊचरच स्वागत करताना आनंद होत आहे.मैदानावरील त्याच्या सिद्ध कौशल्यामुळे आणि प्रशिक्षक म्हणून आपल्या संघाला अनेक विजय मिळवून देण्यासह मार्क एमआयसाठी मोठ योगदान देतील आणि त्याचा वारसा पुढे नेईल."

* प्रशिक्षक म्हणून बाऊचरची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक असताना बाउचरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. 2019 मध्ये त्यांनी आपल्या देशाचे प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने 10 कसोटी सामने जिंकले.

ज्यात या वर्षी जानेवारीत भारताविरुद्ध 2-1 कसोटी मालिका विजयाचा समावेश आहे. संघ सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही (Cricket) बाऊचरच्या प्रशिक्षकपदाखाली संघाने आतापर्यंत 12 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

* प्रशिक्षक म्हणून बाऊचरची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक असताना बाउचरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. 2019 मध्ये त्यांनी आपल्या देशाचे प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने 10 कसोटी सामने जिंकले. ज्यात या वर्षी जानेवारीत भारताविरुद्ध 2-1 कसोटी मालिका विजयाचा समावेश आहे. संघ सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही बाऊचरच्या प्रशिक्षकपदाखाली संघाने आतापर्यंत 12 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

* एमआय कॅप टाऊनच्या कोचिंग स्टाफची घोषणा

मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये समाविष्ट असलेल्या एमआय केपटाऊन फ्रँचायझीच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टार फलंदाजी सायमन कॅटिच यांच्यावर एम आय केपटाऊन संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशिम अमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. मुंबई इंडियन्सचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून अतिरिक्त भूमिका सांभाळतील आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि गृह प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचे सरव्यवस्थापक असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Kerala West Nile Virus: केरळला वेस्ट नाईल व्हायरसचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार!

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

SCROLL FOR NEXT