MI vs RCB Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबईकडून जॉर्डनचे पदार्पण, बेंगलोर संघातही मोठा बदल, पाहा दोन्ही टीमचे Playing XI

MI vs RCB: आयपीएल 2023 स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यातून सहावा विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर उत्सुक असतील.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात 54 वा सामना होत आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून मुंबई इंडियन्ससाठी ख्रिस जॉर्डन पदार्पण करत आहे. त्याला मुंबई संघात दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरच्या जागेवर मुंबई संघात जागा मिळाली आहे.

तसेच बेंगलोरनेही एक बदल केला असून कर्ण शर्माच्या जागेवर विजयकुमार वैशाखला संधी देण्यात आली आहे.

या सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच बेंगलोरने कर्णधार फाफ डू प्लेसिससह ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि जोश हेजलवूड या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघात प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये मुंबईने रमनदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, संदीप वॉरियर आणि राखव गोयल यांना संधी दिली आहे. बेंगलोरने केदार जाधव, मायकल ब्रेसवेल, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा आणि शाहबाद अहमद यांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे.

दोन्ही संघांचा हा या हंगामातील प्रत्येकी 11 वा सामना आहे. तसेच दोन्ही संघांनी आत्तापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघ सहाव्या विजयासाठी उत्सुक असतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेऱ्हेंडॉर्फ

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT