Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 11 चौकार 6 षटकार, वानखेडेमध्ये सूर्याची 'त्सुनामी'; IPL कारकिर्दीतील ठोकले पहिले शतक

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडेवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने तूफानी शतक झळकावले.

आयपीएल (IPL) कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक आहे. सूर्याने गुजरातविरुद्ध 103 धावांची विस्फोटक खेळी खेळली आणि संघाला 218 धावांपर्यंत नेले.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. आता गुजरातला विजयासाठी 219 धावा करायच्या आहेत.

मुंबईकडून सूर्याने 49 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीत सूर्याने 11 चौकार आणि 6 शानदार षटकार ठोकले. सूर्याने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून शतक पूर्ण केले तेव्हा मुंबई संघातील सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.

सूर्याने आयपीएल 2023 मधील चौथे शतक झळकावले

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या मोसमातील चौथे शतक झळकावले आहे. सूर्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, केकेआरचा व्यंकटेश अय्यर आणि सनरायझर्स हैदराबादचा हॅरी ब्रूक यांनी शतके झळकावली आहेत.

या मोसमात शतक झळकावणारे 4 खेळाडू

यशस्वी जैस्वाल (RR)- 124 धावा

सूर्यकुमार यादव (MI) – 103 धावा

व्यंकटेश अय्यर (KKR) – 104 धावा

हॅरी ब्रूक (SRH) - 100 धावा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (क), इशान किशन (प.), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.

गुजरात टायटन्स- रिद्धिमान साहा (w), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (क), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT