Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

Mumbai Indians: ...म्हणून 'रोहितसेना' कोलकाता विरुद्धच्या मॅचमध्ये घालणार WPL मधील जर्सी

मुंबई इंडियन्सचा पुरुष संघ रविवारच्या सामन्यामध्ये वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी घालणार आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) खेळण्यात येणार आहे. पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जाणार आहे. पण या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ त्यांनी नेहमीची जर्सी घालणार नाही.

मुंबई इंडियन्सचा पुरुष संघ या सामन्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी घालणार आहे. यामागे क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सन्मान हे कारण असल्याचे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले आहे.

मुंबई इंडियन्सकडून ESA म्हणजे सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ दिवस (Education and Sports for All) साजरा केला जाणार आहे. हा रिलायन्स फाऊंडेशनचा एक उपक्रम आहे. रिलायन्स फाऊंडेशनचे नेतृत्व मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या नीता अंबानी करतात.

याच उपक्रमाअंतर्गत रविवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर 36 विविध एनजीओमधील 19000 मुली आणि 200 विशेष मुले उपस्थित राहणार आहेत.

याबद्दल निता अंबानी यांनी माहिती दिली आहे की 'हा क्रीडा क्षेत्रातील महिलांबद्दल सन्मान करण्यासाठी खास सामना असणार आहे. यावर्षी पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगसह भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. मुलींच्या शिक्षण आणि खेळाच्या अधिकारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही यावर्षीचा ESA कार्यक्रम मुलींना समर्पित करत आहोत. या रविवारी स्टेडियममध्ये आयपीएल सामन्याचा थेट आनंद घेण्यासाठी विविध एनजीओमधून 19,000 तरुण मुलींना घेऊन येण्याचा रिलायन्स फाऊंडेशनला अभिमान आहे.’

मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची कामगिरी

यंदा मार्च महिन्यात वूमन्स प्रीमियर लीगचा पहिला हंगाम खेळवण्यात आला. या हंगामात अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स महिला संघाने दिल्ली कॅपिटल्स महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत विजेतेपद जिंकले. त्यामुळे पहिल्या डब्ल्युपीएलचे विजेतेपद मिळवण्याचा मान मुंबई इंडियन्स संघाला मिळाला आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची कामगिरी

आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण तिसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. आता त्यांना चौथा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT