Shardul Thakur  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: तुला मानला रे ठाकूर! RCB विरुद्ध ताबडतोड फिफ्टीनंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

KKR vs RCB: कोलकाता नाईट रायडर्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध शार्दुल ठाकूरने 29 चेंडूत 68 धावांची खेळी केल्यानंतर सध्या भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात गुरुवारी झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना तब्बल २०४ धावांचा डोंगर उभा केला. केकेआरकडून शार्दुल ठाकूरने तुफानी अर्धशतक केले. त्यामुळे सध्या या सामन्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजीही करत महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. पण सलामीला आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने एकबाजू सांभाळली होती. त्याने ५७ धावांची खेळी केली.

पण तो बाद झाल्यानंतर केकेआरची एकवेळ ५ बाद ८९ धावा अशी अवस्था झाली होती. पण नंतर शार्दुल ठाकूरने दमदार खेळ करत रिंकू सिंगबरोबर ६ व्या विकेटसाठी ४७ चेंडूत १०३ धावांची भागीदारी केली. शार्दुलने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना आयपीएल २०२३ हंगामातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही केला.

शार्दुलने  29 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. तसेच रिंकू सिंगने ३३ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआर 20 षटकात 7 बाद 204 धावांपर्यंत पोहचू शकले. विशेष म्हणजे कोलकाताकडून केवळ गुरबाज, रिंकू आणि शार्दुल या तिघांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य ४ फलंदाज एक आकडी धावसंख्येवरच बाद झाले.

दरम्यान, शार्दुलच्या या तुफानी खेळामुळे सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना शार्दुलचा त्याच्या टोपननावाचा म्हणजेच 'लॉर्ड'चा उल्लेख केला आहे. तर अनेकांना आरसीबीच्या गोलंदाजीची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, हा दोन्ही संघांसाठी या आयपीएल हंगामातील दुसरा सामना होता. केकेआरला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळताना पराभवाचा सामना केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT