CSK vs GT Dainik Gomantak
क्रीडा

CSK vs GT: चेन्नई - गुजरात फायनलच्या तिकीटासाठी आज लढणार! दोन्ही टीमची ताकद अन् X Factor घ्या जाणून

IPL 2023 प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्याच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत.

Pranali Kodre

IPL 2023, Qualifier 1, Gujarat Titans vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धतील प्लेऑफच्या फेरीला 23 मेपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. या सामन्यात गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने येणार आहेत.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या संधीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे.

कर्णधार धोनी विरुद्ध कर्णधार हार्दिक

चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद एमएस धोनीकडे आहे, तर गुजरात टायटन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आहे. हार्दिक धोनीला आदर्श खेळाडूंपैकी एक मानतो. तो अनेकदा म्हटलाही आहे की त्याने धोनीकडून अनेक गोष्टी शिकल्या आहेत.

त्यामुळे आता नेतृत्वात पंड्या त्याला आदर्श असलेल्या धोनीला भारी पडणार की धोनी त्याच्या अनुभवाच्या जोरावर पंड्याला मात देणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन्ही संघांची ताकद आणि कमजोरी

चेन्नई आणि गुजरात हे दोन्ही संघ या हंगामातील मजबूत संघांपैकी एक आहेत. दोन्ही संघांकडे खेळाडूंचे चांगले पर्याय असून संघात चांगला समतोपणा आहे. फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास गुजरातकडे शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, विजय शंकर असे चांगल्या फॉर्ममध्ये असलेले खेळाडू आहेत. तसचे हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून संघात आहे.

याशिवाय गोलंदाजीत फिरकी गोलंदाजीची मदार सर्वाधिक राशीद खानवर असणार आहे. तसेच वेगवान गोलंदाजीसाठी मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे दोन चांगले पर्याय आहेत.

तसेच चेन्नईची फलंदाजी खोलवर आहे. त्यांच्याकडे जवळपास 8 ते 9 क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवर चांगल्या फॉर्ममध्ये असून मोईन अली, रविंद्र जडेजा सारखे अष्टपैलू संघात आहेत. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि एमएस धोनी चेन्नईची फलंदाजी आणखी मजबूत करतात.

याशिवाय गोलंदाजीत जडेजा, मोईन अली आणि महिश तिक्षणा हे फिरकीपटू आहेत, तर वेगवान गोलंदाजीची मदार दीपक चाहर आणि मथिशा पाथिरानावर असणार आहे. हे सर्व गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सामना चेपॉकला होत असल्याने चेन्नईला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबाही असणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी ही त्यांची ताकद, तर गुजरातसाठी कमजोरी ठरू शकते.

याशिवाय चेन्नईकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत, ही गोष्टही गुजरातवर भारी पडू शकते. पण गुजरातची चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी झाली आहे. गुजरातने चेन्नईविरुद्ध सर्व 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईला गुजरातपासून सावध राहावे लागणार आहे.

त्याचबरोबर चेपॉकची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक समजली जाते. त्यामुळे या मैदानावर दोन्ही संघातील फिरकीपटू कशी कामगिरी करतात हे पाहावे लागणार आहे.

एक्स फॅक्टर

गुजरातसाठी शुभमन गिल आणि राशीद खान एक्स फॅक्टर ठरू शकतात. गिलने सलग 2 शतके केली आहेत. तसेच तो चांगली फिरकी गोलंदाजी खेळतो. तर चेपॉकवर राशीदची फिरकी कमाल करू शकते. त्याचबरोबर राशीद खालच्या फळीत फलंदाजीत योगदानही देऊ शकतो.

चेन्नईसाठी रविंद्र जडेजा आणि सलामीवीर जोडी एक्स फॅक्टर ठरू शकतात. सलामीवीर ऋतुराज आणि कॉनवेने या संपूर्ण हंगामात चेन्नईला दमदार सुरुवात दिली आहे. त्यामुळे त्यांची जोडी या सामन्यात महत्त्वाची ठरले. तसेच जडेजाच्या फिरकीबरोबरच त्याची फलंदाजी क्षमता चेन्नईसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT