Sachin - Arjun Tendulkar  Dainik Gomantak
क्रीडा

'अखेर तेंडुलकरने करूनच दाखवलं' अर्जुनच्या पहिल्या IPL विकेटनंतर सचिनची 'ती' पोस्ट चर्चेत

Pranali Kodre

Sachin Tendulkar post about Arjun IPL Wicket: मंगळवारी (१८ एप्रिल) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०२३ स्पर्धेच्या २५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला १४ धावांनी पराभूत केले. राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननेही विकेट घेतली. त्यामुळे सचिनने याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रियाही दिली आहे.

अर्जुनसाठी हा दुसरा आयपीएल सामना होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध १६ एप्रिलला झालेल्या सामन्यातून आयपीएल पदार्पण करताना २ षटके गोलंदाजी केली होती. पण त्याला विकेट मिळाली नव्हती. मात्र हैदराबादविरुद्ध दुसरा सामना खेळताना त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद केले. ही त्याची पहिली आयपीएल विकेट ठरली.

अर्जुनने ही विकेट घेतल्यानंतर सचिन खूश झाला होता. खरंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून २०१ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, सचिनला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत कधीही विकेट घेता आली नव्हती.

अखेर अर्जुनने आयपीएलमध्ये विकेट घेत सचिनला आयपीएलमध्ये जी गोष्ट जमली नव्हती, ती करुन दाखवली. याबद्दलही सचिनने सामन्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.

सचिनने हैदाराबाद विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यानंतर ट्वीट केले की 'मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा ऑलराऊंड कामगिरी केली. कॅमरॉन ग्रीनने फलंदाजी आणि गोलंदाजी, अशी दोन्हीमध्ये चमक दाखवली. ईशान आणि तिलक यांनी चांगली फलंदाजी केली. आता आयपीएल रोज आणखी रोमांचक होत आहे. चांगले खेळत आहात. आणि अखेर एका तेंडुलकरने आयपीएल विकेट घेतली आहे.'

मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदाराबादला अखेरच्या षटकात २० धावांची गरज होती. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनकडे या षटकात गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली.

अर्जुननेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवताना या षटकात चांगली गोलंदाजी केली. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अब्दुल सामद धावबाद झाला होता. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्जुनने भुवनेश्वर कुमारला चूक करण्यास भाग पाडले. भुवनेश्वरने अर्जुनच्या गोलंदाजीवर मारलेल्या शॉटवर रोहितने कव्हरच्या क्षेत्रात त्याचा झेल घेतला.

या विकेटबरोबरच हैदराबादचा डाव १९.५ षटकात १७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे मुंबईने हा सामना सहज जिंकला. मुंबईकडून अर्जुन व्यतिरिक्त जेसन बेऱ्हेनडॉर्फ, रिली मॅरिडिथ आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीननेही एक विकेट घेतली.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली होती. तसेच ईशानने ३८ धावांची आणि तिलक वर्माने ३७ धावांची खेळी केली.

'अखेर तेंडुलकरने IPL विकेट घेतलीच...', अर्जुनने भुवीला बाद केल्यानंतर सचिनची स्पेशल पोस्ट चर्चेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT