Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्लीच्या फलंदाजांचा बेंगलोरला 'दे धक्का'! सॉल्टच्या 87 धावा अन् DC ने साकारला चौथा विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शनिवारी (6 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट्सने विजय मिळवला. हा दिल्लीचा 10 सामन्यांतील चौथा विजय ठरला आहे.

या सामन्यात बेंगलोरने दिल्लीसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने 16.4 षटकातच 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. दिल्लीकडून फिलिप सॉल्टने शानदार खेळ करत अर्धशतकी खेळी साकारली.

या सामन्यात दिल्लीकडून सलामीला फिलिप सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नर उतरले होते. या दोघांनी दमदार सुरूवात करताना पहिल्या पाच षटकातच 60 धावांची भागीदारी केली. पण चांगल्या सुरुवातीनंतर सहाव्या षटकात वॉर्नरला 22 धावांवर जोश हेजलवूडने बाद केले. पण त्यानंतरही सॉल्टबरोबर मिचेल मार्शची चांगली भागीदारी झाली.

त्यांच्या भागीदारीने दिल्लीला 10 षटकांच्या आतच 100 धावांचा टप्पाही पार करून दिला. यादरम्यान, सॉल्टने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण 11 व्या षटकात मार्शला 26 धावांवर हर्षल पटेलने बाद केले. त्यामुळे मार्श आणि सॉल्ट यांच्यातील 59 धावांची भागीदारी तुटली.

असे असले तरी सॉल्टने नंतर रिली रोसौला साथीला घेतले. रोसौनेही आक्रमक खेळ केला. पण त्यांच्यातही 52 धावांची भागदारी झाली असताना आणि दिल्लीचा विजय जवळ आला असताना सॉल्ट बाद झाला. सॉल्टने 45 चेंडूत 87 धावांची खेळी साकारताना 8 चौकार आणि 6 षटकार मारले.

तो बाद झाल्यानंतर रोसौ आणि अक्षर पटेलने दिल्लीचा विजय निश्चित केला. रोसौ 22 चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला आणि अक्षर 3 चेंडूत 8 धावा करून नाबाद राहिला. बेंगलोरकडून जोश हेजलवूड, कर्ण शर्मा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी चांगली सुरुवातही दिली. त्यांनी सलामीलाच 82 धावांची भागीदारी केली होती. पण त्यांची भागीदारी मिचेल मार्शने ११ व्या षटकात तोडली. त्याने फाफ डू प्लेसिसला 45 धावांवर अक्षर पटेलकरवी झेलबाद करत माघारी धाडले. मार्शने पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेललाही फिलिप सॉल्टच्या हातून झेलबाद केले.

पण नंतर विराट आणि महिपाल लोमरोरची जोडी जमली. या दोघांनी चांगला खेळ करत बेंगलोरचा डाव पुढे नेला. यादरम्यान, विराटने अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर विराटला मुकेश कुमारने बाद केले. विराटने 46 चेंडूत 5 चौकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यानंतर महिपालला दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली होती.

पण चांगल्या सुरुवातीनंतरही कार्तिक अखेरच्या षटकात 11 धावांवर बाद झाला. पण लोमरोरने त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. तो 29 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावा करून नाबाद राहिला. तसेच अनुज रावतने 3 चेंडूत 8 धावा ठोकल्या. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 181 धावा केल्या.

दिल्लीकडून मिचेल मार्शने दोन विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमद आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT